कोरोना व लॉकडाऊनमुळे अविवाहित तरुणीदेखील ‘या’ दलदलीत उतरत आहेत!

1161

कोरोनाचे संकट आणि सततच्या लॉकडाऊनमूळे सामान्य नागरिकांचे जगणे मुश्किल केलेले आहे. तर ज्यांचे पोट हातावर आहे, त्यांच्या पुढे रोजच्या जगण्याची समस्या उभी आहे.

गुजरातमध्ये असे काही घडत आहे की, सामान्य माणूस चक्रावून जाईल. या दुष्टचक्राचे वास्तव गुजरातमध्ये घडत आहे.

अहमदाबादच्या पूर्वेकडील एका 23 वर्षीय तरुणी घर काम करून उदरनिर्वाह करीत होती. मात्र लॉकडाऊन व कोरोनाच्या भीतीने रोजचे काम बंद झाले. त्यानंतर तिच्यासमोर उदरनिर्वाहाची मोठी आर्थिक समस्या उभी राहिली.

काम नाही तर घर कसे चालवायचे हा प्रश्नच होता. त्याच दरम्यान तिला कोणीतरी सरोगसी करण्याचा सल्ला दिला. हातात काम नाही आणि पुढेही कधीपर्यंत सुरळीत होईल याची शाश्वती नसल्याने तरुणीने ते काम स्विकारले.

कोरोना काळात हातातील काम जात असल्यामुळे अनेक महिला सरोगसीकडे वळत असल्याचे दिसून येत आहे. गुजरातमध्ये अशा 20 ते 25 केसेस समोर आल्या आहेत.

सरोगसी मध्ये गर्भाशय भाड्याने दिले जाते. या सर्व प्रकरणात निपुत्रिक जोडपी किंवा ज्यांना मुलं होणे शक्य ते सरोगसीसाठी गर्भ भाड्याने दिले व घेतले जाते.

सर्वात धक्कादायक म्हणजे यातील अनेक तरुणी ह्या अविवाहित आहेत. त्यांना सरोगसीसाठी 3 ते 4 लाख रुपये आणि मेडिकलचा खर्च धनाढ्य व्यक्तींकडून मिळतो.

न्यूज १८ ने दिलेल्या वृत्तानुसार एका महिलेने तिचे दुःख व्यक्त करताना सांगितले की, माझे नाव रीमा आहे. (नाव बदलले आहे) वय 23 वर्षे आहे. अद्याप माझे लग्न झालेले नाही. वडील मला व आईला सोडून निघून गेले व दुसरे लग्न केले, आम्ही भाड्याच्या घरात राहतो.

घरकाम करुन आईने मला मोठे केले आहे. तिला मदत म्हणून मी नोकरी करीत होते. मात्र कोरोनामुळे हातातली नोकरी गेली. आईचे कामही बंद झाले. घरभाडे तर द्यावे लागत होते.

जेव्हा सगळे रोजगार बंद झाले, तेव्हा जगण्यासाठी पैसे हवे होते. मात्र लॉकदाऊनमुळे कोणतेही काम मिळत न्हवते. तेव्हा एका परिचित व्यक्तीने मला सरोगसी बद्दल माहिती दिली, तेव्हा मी सरोगेट आई होण्याचं ठरवले.

गुजरातमध्ये सेरोगसीच्या अनेक केसेस समोर आल्या असून एडव्होकेट अशोक परमार यांनी सांगितले की, त्यांच्या ओळखीच्या महिलेच्या पतीचे निधन झाले, हातात पैसे येत नव्हते. मुलांसाठी त्या महिलेने नोकरी केली.

काही दिवसांनी नोकरी सुटली. त्यानंतर जेवणाच्या डब्याचे काम सुरू केले. मात्र लॉकडाऊनमुळे ते देखील बंद झाले. तिला कोणीतरी सरोगसीबद्दल सांगितले. पैशांच्या गरजेतून चक्क विधवा असताना तिने सेरोगसी स्विकारली आहे.

आज लॉकडाऊन वाढत चालले असल्याने अनेक महिला व अविवाहित तरुणी देखील या व्यवसायाच्या दलदलीत उतरत आहेत. लॉकडाऊनचे हे भयाण वास्तव पाहिल्यावर गरिबांचे जग उध्वस्त झाले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here