ED Summon आणि कोरोनाची लक्षणे | एकनाथ खडसे 14 दिवसांनी ईडीसमोर हजर होणार!

170

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे आज चौकशीसाठी अंमलबजावणी संचालनालयाच्या कार्यालयात हजर राहणार नाही.

कोरोनाची सौम्य लक्षणे असल्याने डॉक्टरांच्या सल्ल्याने विश्रांती घेणार असून त्यानंतर चौकशीसाठी हजर होण्यासाठी ईडीकडून संमती मिळाली आहे, अशी माहिती एकनाथ खडसे यांनीच पत्रकाद्वारे दिली आहे.

दरम्यान, ईडी चौकशीच्या निमित्ताने एकनाथ खडसे कालच मुंबईत दाखल झाले आहेत. भोसरी एमआयडीसी भूखंड प्रकरणी एकनाथ खडसे यांना ईडीने नोटीस पाठवली आहे.

त्यानंतर आज 30 डिसेंबरला त्यांचा ईडी कार्यालयात हजर राहायचं होतं. परंतु मागील दोन दिवसांपासून खडसे यांचा ताप, सर्दी आणि खोकला जाणवत आहे. कोरोनाची लक्षणे असल्याने चाचणी केली असून अहवाल प्रतीक्षेत आहे.

त्यामुळे डॉक्टरांनी 14 दिवसांच्या विश्रांतीचा सल्ला दिला आहे. याबाबत ईडीला कळवलं असून त्यांनी 14 दिवसांनी चौकशीसाठी हजर राहण्याची परवानगी दिली आहे, असं खडसे यांनी सांगितलं.

ईडीला पूर्ण सहकार्य करणार : एकनाथ खडसे

एकनाथ खडसे यांनी जारी केलेल्या पत्रकात लिहिलं आहे की, “दिनांक 30 डिसेंबर 2020 रोजी मुंबई येथील कार्यालयात उपस्थित होण्याबाबत सक्त वसुली संचालनालय (ईडी) कडून समन्स प्राप्त झाले होते.

ईडी कार्यालयाकडे खुलासा सादर करण्यासाठी दिनांक 30 डिसेंबर रोजी हजर होणार होतोच. मात्र मध्यंतरी 28 डिसेंबर रोजी ताप, सर्दी, कोरडा खोकल्याचा त्रास सौम्य प्रमाणा त जाणवला.

उत्तर महाराष्ट्रातील खडसेंच्या काही सर्मथकांनीही भाजपमध्ये प्रवेश केला होता. पक्ष सोडताना त्यांनी ईडी लावली तर मी सीडी लावेन असंही खडसे यांनी म्हटलं होतं. त्यामुळे एक ना एक दिवस आपल्याला ईडीची नोटीस मिळेल, असंही ते म्हणाले होते.

वैद्यकीय तपासणीअंती कोरोना सदृश्य लक्षणे असल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले. कोरोनाची चाचणी घेतली.  निष्कर्ष अद्याप प्रलंबित आहेत. वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या सल्लानुसार 14 दिवस विश्रांती आवश्यक आहे.

तसे ईडी कार्यालयास कळवले आहे. त्यांनी 14 दिवसांनंतर हजर होण्याबाबत संमती दिलेली आहे. माझी प्रकृती बरी झाल्यावर सक्त वसुली संचालयास (ईडी) पूर्ण सहकार्य करणार आहे. धन्यवाद”

Eknath Khadse ED Summon | एकनाथ खडसे 14 दिवसांनी ईडीसमोर हजर होणार!भोसरी भूखंड प्रकरणी ही नोटीस आहे. याआधीही चार वेळा चौकशी झाली आहे, ही पाचवी आहे. त्यांना जे सहकार्य लागले ते मी केले आहेत. आता देखील सहकार्य करेन.

मी यापेक्षा जास्त बोलू इच्छित नाही, असं एकनाथ खडसे म्हणाले ईडीच्या नोटीसबाबत म्हणाले होते. एकनाथ खडसे यांनी भाजपला रामराम करुन ऑक्टोबर महिन्यात राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता.

 

‘खडसेंना दिलेल्या ईडीच्या नोटीसीची भीती नाही’

दरम्यान, खडसेंना आलेल्या ईडीच्या नोटिसीनंतर महाविकास आघाडीच्या नेत्यांनी भाजपवर टीका केली आहे. राजकीय नेता जर भाजपच्या विरोधात जातो त्यांच्यामागे ईडी लावण्याचं काम भाजप करत आहे.

देश हिताच्या निर्णयपेक्षा सूड भावनेच्या प्रवृत्तीने राजकीय नेत्यांच्या मागे लागले जाते. मात्र खडसे यांना पाठवलेल्या नोटीसीची आम्हाला कुठलीही भीती वाटत नाही, असं जयंत पाटील यांनी म्हटलं होतं.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here