मानवी कृती व विचारांचा प्रभाव पर्यावरणावर पडतो : ब्र.कु. महानंदा दिदी

280
कोरोनावर उपचार घेऊन घरी परतलेल्या युवकाच्या आईला मुलाचा कोरोनाने मृत्यू झाल्याचा फोन आला!

उदगीर : मानव आणि पर्यावरणाचे अतुट नाते आहे. मानवाचे जिवन पूर्णपणे पर्यावरणावर अवलंबुन आहे. मानवाच्या लोभीवृत्ती, भौतिकतालोलूप जीवनामुळे मानव पर्यावरणाला अपरीमीत हानी पोचवत आहे.

मानवाची कृती व विचार दोन्हीचा प्रभाव पर्यावरणावर पडतो त्यामुळे सकारात्मक वृत्ती व नैसर्गिक जीवनपध्दती यामुळे पर्यावरणाची हानी रोखता येईल असे उद्गगार ब्र.कु.महानंदा दिदी यांनी व्यक्त केले.

त्या जागतिक पर्यावरणा दिना निमित्त आयोजित “पर्यावरण सरंक्षण” कार्यक्रमात बोलत होत्या. पर्यावरण दिनानिमित्त ब्रह्माकुमारीज उदगीर द्वारे वेबिनारचे आयोजन करण्यात आले होते.

त्यात राज्याचे पर्यावरण मंत्री मा.भ्रा.संजय बनसोडे, महाऊर्जाचे विभागीय महाव्यवस्थापक देविदास कुलकर्णी, संजय पंचगले सहाय्यक सचिव म.रा.मा. व उ.मा.शि.मंडळ विभागीय कार्यालय लातूर, वृक्षमित्र डॉ.प्रकाश येरमे, डॉ.मारोती चव्हाण, कनकवली, वृक्षमित्र अनिल चवळे अहमदपूर, डॉ.सुधीर बनशेळकीकर आरोग्य अधिकारी लातूर यांचा विशेष सहभाग होता.

या प्रसंगी सर्वांनी वृक्षांची लागवड व त्याचे संगोपन या दोन्हींचे महत्व व्यक्त केले व सर्वांना एक तरी वृक्ष लावून त्यांचे संगोपन करण्याचे आवाहन केले.

या वेबिनारचे यशस्वी आयोजन ब्र.कु.केदार खमीतकर व ब्र.कु.किरण खमीतकर लातूर यांनी केले. कार्यक्रमाची सुरुवात ब्रह्माकुमारीज सद्भावना भवन येथे दिप प्रज्वलन करुन करण्यात आली तर आभाराचे पुष्प सृजन बहुद्देशीय संस्थेचे सचीव महादेव खळूरे यांनी अर्पित केले व सुत्र संचालन ब्र.कु.रश्मि बहेन यांनी केले.

या कार्यक्रमास वृक्ष मित्र संस्था, सृजन बहुद्देशीय संस्थेचे बंधु भगिनी ऑनलाईन उपस्थित होते. याच दरम्यान जागतिक तांबाखू निषेध दिनानिमित्त आयोजित चित्रकला स्पर्धेत सहभागी झालेल्या विजेत्या स्पर्धकांची नावे व बक्षीस जाहिर करण्यात आले.

पर्यावरण दिनानिमीत्त विविध कार्यक्रमात सहभागी झालेले राज्याचे पर्यावरण मंत्री संजयजी बनसोडे यांनी ब्रह्माकुमारीज च्या उदगीर शाखेला पर्यावरण दिनानिमीत्त भेट दिली.

अध्यात्मिकता व पर्यावरण या विषयावर सेवाकेंद्र संचालिका ब्र.कु.महानंदा दिदी व मा.संजयजी बनसोडे यांच्यात चर्चा झाली या सदिच्छा भेटीप्रसंगी डेप्युटी कलेक्टर प्रविण मेंगशेट्टी, तहसिलदार रामेश्वर गोरे, राष्ट्रवादीचे महासरचिटणीस मा.भ्रा.बस्वराज पाटील नागराळकर, अंबरखाने ब्लड बॅकेचे अध्यक्ष रमेश अंबरखाने हे ही उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here