सध्या कोरोनाच्या रुग्णांची संख्या खूप वाढत असून त्यांना देण्यात येणाऱ्या सुविधा या अपुऱ्या पडत आहेत.
कोरोना पेशंटची संख्या वाढली असून त्यांना मिळणारा ऑक्सिजन, तसेच रेमेडीसीवर इंजेक्शन यांचा खूप मोठ्या प्रमाणावर तुटवडा जाणवत आहे.
राज्य शासनाने लवकरात लवकर ऑक्सिजन सिलेंडर व रेमिडीसिव्हर इंजेक्शनचा पुरवठा सुरळीत करावा, याकरीता उदगीर भारतीय जनता पार्टी तर्फे उपजिल्हाधिकाऱ्यांमार्फत निवेदन देण्यात आले.
जनतेवर लॉकडाउनचा जो निर्बंध लादण्यात आलेला आहे तो अतिशय चुकीचा असून प्रामुख्याने कटिंग सलून करण्याची परवानगी देण्यात यावी. आरोग्यविषयक सेवांकडे विशेष लक्ष देऊन नागरिकांचे प्राण वाचवण्यासाठी यंत्रणा उभी करावी अशी मागणीही यावेळी करण्यात आली.
यावेळी प्रदेश उपाध्यक्ष माजी आमदार गोविंद केंद्रे, अ.जा.मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष माजी आमदार सुधाकर भालेराव, जेष्ठ नेते धर्मपाल नादरगे, माजी जि.प.उपाध्यक्ष रामचंद्र तिरुके, तालुका अध्यक्ष बसवराज रोडगे, शहराध्यक्ष उदयसिंह ठाकूर, जिल्हाध्यक्ष अ.जा.बालाजी गवारे, प्रा.पंडित सूर्यवंशी, उत्तरा कलबुर्गे, शिवाजी भाळे, सरचिटणीस श्यामल कारामुंगे, महिला अध्यक्ष मधुमती कानशेट्टे, नगरसेवक गणेश गायकवाड, नगरसेवक दत्ता पाटील, रुपेंद्र चव्हाण, राजकुमार मुक्कावार, सावन पासत्तापुरे, आनंद बुंदे, युवा मोर्चा अध्यक्ष अमोल निडवदे, प्रकाश तोंडारे, मुक्रम जहागिरदार, भाऊसाहेब जांभळे, अमित बोळेगावे, संतोष बडगे, रवींद्र बेद्रे, दयानंद उदबाळे, दिनेश देशमुख, विरलाल कांबळे, संजय पांढरे, दीपक शिंदे, अनिता बिरादार, उषाताई माने, शिवकर्णा अंधारे, अरुणा बेळकोने, जयश्री टिळेकर, महादेवी पाटील, रंजना बोडगे, बबिता पांढरे यांच्यासह पदाधिकारी व असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.