Employment News | माझगाव डॉकमध्ये 410 पदांवर निघाली भरती; 8 वी पास तरुणांना सरकारी नोकरीची सुवर्णसंधी

478

Employment News | माझगाव डॉकमध्ये 410 पदांवर निघाली भरती; 8 वी पासना सरकारी नोकरीची सुवर्णसंधी

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणात सरकारी नोकरीच्या जाहिराती निघाल्यात.

अनेक ठिकाणी मोठी भरती करण्यात येत आहे. विशेष म्हणजे माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेडमध्येही सरकारी नोकरीची सुवर्णसंधी मिळत आहे.

8 वी उत्तीर्ण उमेदवारही या नोकरीसाठी अर्ज करू शकतात.

माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेड(MDL)(भारत सरकारचा संरक्षण मंत्रालयांतर्गत एक उपक्रम) मुंबई अॅप्रेंटिसेस अॅक्ट, 1961 अंतर्गत 8 वी, 10 वी, आयआयटी उत्तीर्ण उमेदवारांची वर्ष 2020 करिता व्यवसाय प्रशिक्षणार्थी (ट्रेड अॅप्रेंटिसेस) च्या एकूण 410 पदांवर निवड करण्यात येणार असून, त्यासाठीची ही भरती निघाली आहे. (Mazagaon Dock Recruitment 2021 Notification Download Check Online Application Link)

एकूण- 410 पदांवर भरती

रिगर- 40 पदे
वेल्डर (गॅस आणि इलेक्ट्रिक )- 39 पदे
इलेक्ट्रिशियन- 31 पदे
फिटर – 57 पदे
पाइप फिटर- 74 पदे
स्ट्रक्चरल फिटर – 43 पदे
आयसीटीएसएम -15 पदे
इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक- 29 पदे
फिटर स्ट्रक्चरल- 54 पदे
कारपेंटर – 28 पदे

वयोमर्यादा

विविध पदांसाठी तीन गटांनुसार 14 वर्षे ते 21 वर्षांपर्यत वयोमर्यादा निश्चित करण्यात आली असून, या वयोगटातील उमेदवार नोकरीसाठी अर्ज करू शकतात.

किती पगार मिळणार?

गट अ 10 वीस पास 6 हजार पगार, गट ब आयटीआय 8050 पगार, गट क 5 हजारांपासून सुरुवातीला पगार निश्चित करण्यात आला असून, पुढे पदोन्नतीनुसार त्यात वाढ करण्यात येणार आहे.

ऑनलाइन अर्ज स्वीकारण्याची अंतिम तारीखः ११ जानेवारी २०२१
निवड पद्धती- प्रशिक्षणार्थींची प्रवेश प्रक्रिया ३ टप्प्यांत होणार आहे. 

पहिला टप्पा- ऑनलाइन परीक्षा
परीक्षा केंद्र – मुंबई, नागपूर, पुणे आणि औरंगाबाद

दुसरा टप्पा

वैद्यकीय तपासणी तसेच कागदपत्रांची पडताळणी होणार, प्रत्येक ग्रुपमधील ऑनलाइन परीक्षेत मिळालेल्या गुणांनुसार गुणवत्ता यादी तयार करण्यात येणार

तिसरा टप्पा

ट्रेड वितरण प्रक्रियेसाठी वैद्यकीयदृष्ट्या सक्षम असल्याचं प्रमाणपत्र प्राप्त केलेल्या आणि कागदपत्रांची पूर्ण पडताळणी पार पाडलेल्या उमेदवारांना बोलावले जाणार

अर्जाचे शुल्क

१०० रुपये उमेदवारांना वसतिगृहाची सुविधा पुरवली जाणार नाही.

ऑनलाइन परीक्षेसाठी अॅडमिट कार्ड/ हॉल तिकीट फेब्रुवारी २०२१ च्या पहिल्या आठवड्यात पाठविले जाणार आहे.

या भरतीसाठी उमेदवारांनी http://mazagaondock.in/career-apprentice.aspx या संकेतस्थळाला अवश्य भेट द्यावी

ऑनलाइन अर्ज कसा करावा

http://mazagaondock.in या संकेतस्थळाला भेट द्या.

त्यानंतर career/onlinerecruitment apprentices या लिंकमधून create new account वर क्लिक करा, अर्ज लॉगिन केल्यानंतर अप्लाय करा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here