मुंबई : देशातील गर्भश्रीमंत उद्योगपती मुकेश अंबांनी यांच्या घराजवळ स्फोटकांनी भरलेली गाडी आढळून आल्याने खळबळ उडाली होती.
आता या प्रकरणात जी गाडी स्फोटके ठेवण्यासाठी वापरण्यात आली होती, त्या गाडीच्या मालकाचा मृतदेह आढळून आल्याने प्रकरणाने आता वेगळेच वळण घेतले आहे.
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणात तपास अधिकारी असलेल्या सचिन वाझे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. ते म्हणाले की, या प्रकरणातून अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत.
त्या ठिकाणी दोन गाड्या आल्या होत्या. या दोन्ही गाड्या एकाच मार्गाने आल्या. गाडी ओळखल्यानंतर सचिन वाझे पहिल्यांदा पोहोचले. कोणीही पोहोचण्याआधी ते पोहोचले.
त्यानंतर क्राइम, स्थानिक पोलीस ठाण्याचे आणि इतर लोक आले. या प्रकरणा चौकशी करण्यासाठी सचिन वझे यांनी तपास अधिकारी म्हणून नेमण्यात आले. नंतर त्यांना दुसऱ्या अधिकाऱ्याकडे तपास सचिन वाझे यांना दूर का केलं हे समजलं नाही?
फडणवीस पुढे म्हणाले की, या प्रकरणात सर्वात महत्त्वाचा दुवा मनसुख हिरेन (स्फोटकांनी भरलेल्या गाडीचे मालक) होते. त्यांना तत्काळ सुरक्षा द्यायला हवी.
मला आताच माहिती मिळाली आहे की, मनसुख हिरेन यांचा मृतदेह सापडला आहे. त्यामुळे हे प्रकरण गंभीरच नाही तर अत्यंत गुंतागुंतीचं आहे.
त्यामुळे जो संशय तयार झाला आहे आणि मुख्य साक्षीदाराची बॉडी मिळते यावरून निश्चितच काही गौडबंगाल आहे. त्यामुळे हे प्रकरण तत्काळ एनआयएकडे दिलं पाहिजे.
सचिन वाझे कोण आहेत? (Who is Sachin Waze?)
सचिन वाझे १९९० च्या बॅचचे अधिकारी आहेत. त्यांनी आतापर्यंत ६३ एन्काऊंटर केले आहेत. मुंबईतील घाटकोपर बस बॉम्बस्फोटाचा आरोपी ख्वाजा युनूसचा पोलिस कोठडीत मृत्यू झाला होता.
या प्रकरणात काही पोलिसांवर हत्या आणि पुरावे नष्ट केल्याचा आरोप झाला त्यामध्ये सचिन वाझेही यांचाही समावेश होता. दरम्यान, सचिन वाझे यांच्यासह कॉन्स्टेबल राजेंद्र तिवारी, सुनील देसाई आणि राजाराम निकम यांना पुन्हा सेवेत रुजू करण्यात आले आहे.
त्या प्रकरणात त्यांना २००४ मध्ये निलंबितही करण्यात आले होते. २००७ मध्ये त्यांनी राजीनामा दिला, मात्र तपास सुरु असल्याने तो मंजूर करण्यात आला नव्हता. त्यानंतर २००८ च्या दसरा मेळाव्यात ते शिवसेनेत दाखल झाले.