लिंगपिसाट सैतानाने कुटुंबाला संपविले | नराधमाने मेहुणीवर अत्याचार केल्यावर हत्या करून; आत्महत्या केली!

160
Lingpisat Satan ended the family Murdered after being tortured by a man; Committed suicide!

नागपुरातील हत्याकांडात नवा ट्विस्ट, आरोपीने हत्येचा प्लान आधीपासूनच आखला होता त्यासाठी त्याने ऑनलाईन चाकू मागवले होते. ते त्याच्या मुलीच्या नावाने आल्याचे पुढे आले आहे.

नागपूर :  काल नागपुरात कुटुंबातील पाच जणांची हत्या करुन तरुणाने आत्महत्या केल्या घटना उघडकीस आली होती.

या प्रकरणात आता नवनवीन धक्कादायक खुलासे समोर येत आहेत. आरोपीने मेव्हणीची हत्या करण्यापूर्वी अत्याचार केला असावा असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. पोलीस तरुणीच्या पोस्ट मॉर्टम रिपोर्टची वाट पाहत आहे.

मेव्हणीला चाकूचा दाखवत अतिप्रसंग?

नागपुरात राहणाऱ्या आलोक माटूरकर याने पत्नी, दोन मुलं, सासू आणि मेव्हणी अशा पाच जणांची हत्या करुन आत्महत्या केली होती.

सोमवारी हा प्रकार उघडकीस आल्यानंतर नागपूरसह संपूर्ण महाराष्ट्र हादरला होता. मात्र काही तासातच या प्रकरणात नवीन धक्कादायक खुलासे पुढे येत आहेत.

आरोपी आलोक माटूरकरने हत्या करण्यापूर्वी मेव्हणीला चाकूचा दाखवत अतिप्रसंग केली असावी असा संशय आहे. त्यानंतर त्याने तिचा गळा कापला असण्याची शक्यता आहे.

भाऊजी घरात येताच काहीतरी करेल याचा अंदाज असल्याने मेहुणीने मोबाईलमध्ये ऑडिओ रेकॉर्डिंग सुरु केले होते. त्यात त्यांच्या संघर्षाचा आवाजही रेकॉर्ड झाल्याची माहिती आहे.

हत्येचा कट आधीपासूनच रचला

आरोपीने हत्येचा प्लान आधीपासूनच आखला होता त्यासाठी त्याने ऑनलाईन चाकू मागवले होते. ते त्याच्या मुलीच्या नावाने आल्याचे पुढे आले आहे.

आरोपी हा काही वेबसाईटच्या माध्यमातून महिला वशीकरणची माहिती काढत असल्याची माहितीही पुढे येत आहे. मात्र त्याचा उपयोग त्याने यात केला की नाही याची माहिती घेतली जात आहे.

पोलिसांनी यातील अनेक घटनांना दुजोराही दिला, मात्र तपास सुरू असल्याने त्यावर पोलीस विशेष बोलण्याचे टाळत आहेत.

नागपूरला हादरवणाऱ्या या घटनेचा तपास पोलीस सगळ्याच बाजूने करत आहेत. यात नेमके काय झाले आणि कोणती अशी कारणे होती की सर्वसाधारण व्यक्तीने एवढे टाकाचे पाऊल उचलले.

आपल्या जवळच्या पाच जणांची मोठ्या निर्दयतेने हत्या केली आणि स्वतः आत्महत्याही केली, याचे कोडे उलगडण्याचे पोलिसांसमोर आव्हान आहे. शव विच्छेदन अहवाल पुढे आल्यानंतर अनेक बाबी स्पष्ट होण्याची शक्यता आहे.

कौटुंबिक वादातून हत्याकांड?

नियमित सकाळी उठून कामाला लागणारा हा परिवार आज सकाळी घराबाहेर पडला नाही. दार बंद होते त्यामुळे शेजाऱ्यांनी खिडकीतून आत बघितले असता मुलगा बाहेर मृतावस्थेत पडलेला दिसला. त्याची माहिती शेजाऱ्यांनी पोलिसांना दिली.

पोलीस घटनास्थळी दाखल होताच समोर आलेले चित्र भीषण व हृदय हेलावून टाकणारे होते. पत्नी विजया आणि मुलगी परी आतल्या खोलीत मृतावस्थेत पडले होते. तर आलोकने गळफास लावून घेत आत्महत्या केली होती.

पुढील चौकशीसाठी पोलीस आलोकच्या सासूकडे गेले असता त्यांच्या घरात सासू लक्ष्मी बोबडे आणि मेहुणी अमिशा बोबडेही मृतावस्थेत पडलेले पाहायला मिळाले.

दुपारी 12 च्या सुमारास पोलिसांना या घटनेची माहिती मिळाली. पोलिसांच्या प्राथमिक अंदाजानुसार कौटुंबिक कलहातून हे हत्याकांड घडल्याची शक्यता त्यांनी व्यक्त केलीय.

नागपूर शहर हादरले

एकाच कुटुंबातील 5 जणांच्या हत्याकांडामुळे नागपूर शहर हादरले आहे. या हत्याकांडामागील कारण कौटुंबिक आहे की, अजून काही याचा तपास पोलीस करत आहेत.

आलोक सर्वसामान्य परिवारातील होता. त्याच्या सासूची परिस्थितीही साधारणच होती. मग, आलोकने अशाप्रकारचे टोकाचे पाऊल उचलण्याचे कारण काय? याचा शोध नागपूर पोलीस करत आहेत.

पत्नी, दोन मुलं, सासू आणि मेहुणीची हत्या करुन आत्महत्या करण्याच्या या घटनेमुळे नागपुरात एकच खळबळ माजली आहे. नागपूरमध्ये अशाच प्रकारची एक घटना जून, 2018 मध्ये दिघोरी परिसरात घडली होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here