तरुणांसाठी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस राबवणार उद्योजक निर्माण अभियान : युवराज कांडगिरे

341

राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या उद्योजक निर्माण अभियानात जास्तीत जास्त लोकांनी सहभागी व्हावे : प्रदेशाध्यक्ष सुनील गव्हाणे

लातूर : जिल्ह्यातील व उदगीर तालुक्यातील तरूणांना त्यांच्या मनातील उद्योग व्यवसाय उभा करण्यात मदत करण्यासाठी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस पुढे सरसावली आहे.

राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील गव्हाणे यांच्या संकल्पनेतून आणि प्रदेश सरचिटणीस तुषार जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण राज्यात हे अभियान राबविण्यात येणार आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या 22 व्या वर्धापन दिनाच्या औचित्य साधत काही दिवसांपूर्वी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत या अभियानाची घोषणा करण्यात आली होती.

या अभियानाअंतर्गत उद्योग व्यवसाय सुरू करू इच्छिणाऱ्या तरुणांची नोंदणी करण्यात येणार असून, त्यांना केंद्र व राज्य शासनाच्या सर्व योजनांची व अनुदानांची माहिती देण्यात येणार आहे.

त्याचबरोबर तरुणांना जो उद्योग व्यवसाय उभा करायचा आहे, त्याबाबत तज्ञांचे मार्गदर्शन, उद्योग-व्यवसायाच्या प्रत्यक्ष क्षेत्र भेटी, प्रकल्प अहवाल, भांडवल उभारणीचे पर्याय, यंत्र सामुग्री आणि पायाभूत सुविधा उभारणे, याबाबतचे मार्गदर्शन आणि सहकारी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या माध्यमातून करण्यात येणार आहे.

या उपक्रमाच्या माध्यमातून वर्षभरात किमान पाचशे उद्योजक तयार करण्याचा मानस प्रदेशाध्यक्ष सुनील गव्हाणे यांनी व्यक्त केला असून राष्ट्रवादी काँग्रेस मराठवाडा विभागाचे अध्यक्ष प्रशांत कदम व जिल्हाध्यक्ष मुस्तफा इनामदार यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण जिल्ह्यामध्ये शहरांमध्ये हा उपक्रम राबविण्यात येणार आहे.

जिल्ह्यातील जास्तीत जास्त तरुणांनी यामध्ये सहभागी व्हावे असे आवाहन राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे लातुर जिल्हा उपाध्यक्ष युवराज कांडगिरे यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here