उद्योजक राहुलभैय्या रमेश अंबेसंगे यांचा वाढदिवस उत्साहात साजरा, वाढदिवसानिमित्त 75 जणांचे रक्तदान

479

उदगीर येथील उद्योजक माजी नगरसेवक राहुलभैय्या रमेश अंबेसंगे यांच्या वाढदिवसानिमित्त अनेक सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.

राहुल आंबेसंगे यांच्या वाढदिवसानिमित्त (दि.३१) अन्नदान करण्यात आले. यासोबतच गरीब कुटुंबांना अन्नकिट व संसारोपयोगी वस्तूंचे वाटप करण्यात आले.

सकाळी १० वाजता कै. नागप्‍पा अंबरखाने ब्लड बँक उदगीर येथे राहुल पाटील मलकापूरकर यांच्या हस्ते रक्तदान शिबिराचे उद्घाटन करण्यात आले. या रक्तदान शिबिरामध्ये 75 रक्तदात्यांनी रक्तदान करून आपल्या मित्राला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.

राहुल आंबेसंगे मित्रमंडळाच्यावतीने दरवर्षी विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात येतात. यंदाही कोविडच्या नियमांचे पालन करीत वाढदिवस साजरा करण्यात आला.

मित्रमंडळाचे प्रमुख राहुल पाटील मलकापूरकर यांच्या मार्गदर्शनाखाली विविध सामाजिक उपक्रम आयोजित करण्याचा संकल्प करण्यात आला आहे.

राहुल आंबेसंगे यांच्या वाढदिवसानिमित्त विविध संस्था व संघटनांच्यावतीने विविध कार्यक्रम व उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी राहुल आंबेसंगे मित्रमंडळाच्यावतीने आगामी पावसाळ्यात 1000 वृक्ष लागवड करण्याचा संकल्प करण्यात आला.

नवीन शैक्षणिक वर्षात गरजवंत मुलांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात येणार आहे. तर कोविड संकटात मुलांचा अभ्यास खंडीत होऊ नये म्हणून विविध तज्ञांचे ऑनलाईन मार्गदर्शन उपलब्ध करून दिले जाणार आहे.

राहुल आंबेसंगे यांचा वाढदिवस यशस्वी करण्यासाठी मित्र मंडळातील राहुल पाटील मलकापूरकर, राहुल मुच्चेवाड, बंडु भाऊ कांबळे, बाळू बिरादार, बालाजी शेटकार, संतोष हणमंते, कपिल शेटकार, नवनाथ लटपटे, दत्ता पाटिल दवणहिप्परगा, तम्मा बाळे, राम पाटील नागलगाव, केदार पाटील नगालगाव व राहुलभैय्या रमेश अंबेसंगे मित्र मंडळाचे पदाधिकारी व अनेक पक्ष, सामाजिक संस्थाचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here