आधार कार्ड नसले तरीही लस आणि अत्यावश्यक सेवा मिळेल : यूआयडीएआयची घोषणा

168
Even without the Aadhaar card, you will get vaccines and essential services: UIDAI announcement

कोरोना लसीकरणासाठी आधार कार्ड अनिवार्य नाही असे (UIDAI) यूआयडीएआयने स्पष्टीकरण दिले आहे.

आधारकार्ड शिवाय कोणत्याही रूग्णाला उपचार, रुग्णालयात दाखल करून घेणे किंवा उपचार नाकारता येणार नाही, असेही यूआयडीएआयने म्हटले आहे.

आधार कार्डशिवाय कोणालाही लसीकरणासाठी रोखता येत नाही यूआयडीएआयने घोषणा केली आहे. कोरोना काळात प्रत्येकाला आवश्यक सुविधा मिळणे फार महत्वाचे आहे.

आधारकार्ड  उपलब्ध नसले तरी त्यांना सर्व सुविधा मिळणे अत्यंत गरजेचे आहे. विशेष म्हणजे जर तुमच्याकडे आधार कार्ड नसेल तरीही कोरोना लस, औषधे आणि रुग्णालयात भरतीही होता येईल असे UIDAI ने जाहीर केले आहे.

आधार कार्ड नसल्यामुळे एखाद्या व्यक्तीला आवश्यक वस्तू न मिळाल्यास किंवा ऑनलाईन नोंदणी करण्यात काही अडथळे असल्यास एजन्सी किंवा विभागाला आधार अधिनियम २०१६ मध्ये नमूद केलेल्या विशिष्ट निकषानुसार ही सेवा द्यावी लागेल असे यूआयडीएआयने सांगितले आहे.

सासऱ्याचा जीव सुनेवर जडला, त्याने आपल्याच मुलाचाचं घात केला ! सासऱ्याचे कृत्य पाहून पोलिसही हैराण

आधार कार्ड ही प्रत्येक भारतीय नागरिकासाठी महत्वाचे कागदपत्र आहे. आधार कार्ड हे भारतीय नागरिकांचे महत्त्वाचे ओळखपत्र आहे. तसेच आधारकार्डामुळे कोणाच्याही आवश्यक सेवांवर परिणाम होणार नाही, असे एक परिपत्रक 24 ऑक्टोबर 2017 रोजी जारी करण्यात आले होते. म्हणूनच कोरोना कालावधीत काही कारणास्तव आधार कार्ड उपलब्ध नसले तरीही सर्व आवश्यक सेवांचा लाभ घेता येणार आहे.

सुविधा नाकारता येणार नाही

देशभरात कोरोनाची दुसरी लाट उफाळून आली आहे. आधार कार्डशिवाय बर्‍याच ठिकाणी उपचार, रुग्णालयात दाखल करणे आणि लसी देण्यास नकार दिला जात आहे.

ज्या नागरिकांकडे 12-अंकी आधार नंबर नाही त्यांना लसीसह इतर सुविधा देखील देण्यात याव्यात. जर एखाद्या नागरिकाकडे आधार कार्ड नसेल तर या सुविधा नाकारता येणार नाहीत, असे यूआयडीएने स्पष्ट केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here