ज्या रेमडेसिवीरसाठी अख्खा महाराष्ट्र रांगेत, ते नेमके किती प्रभावी? वाचा WHO काय म्हणते?

796

मुंबईसह देशभरात रेमडेसिवीर लसची कमतरता भासत आहे. त्यावरून राजकारणही सुरू झालेले आहे.

मात्र, या लसीच्या परिणामकारकतेबाबत जागतिक आरोग्य संघटनेने शंका उपस्थित केली आहे. त्यामुळे ही लस किती प्रभावी आहे, यावरून तर्कवितर्क लढवले जात आहेत.

रेमडेसिवीर कोरोना रुग्णांसाठी प्रभावी आहे की नाही याबाबत कोणतेही पुरावे मिळालेले नाहीत, असे जागतिक आरोग्य संघटनेने म्हटले आहे.

डब्ल्यूएचओचे मुख्य शास्त्रज्ञ डॉ. सौम्या स्वामिनाथ आणि कोविड टेक्निकल हेड डॉय मारिया वेन केरखोव यांनी एका वृत्तसंस्थेशी बोलताना रेमडेसिवीरवर प्रश्नचिन्हं उपस्थित केले आहेत.

रेमडेसिवीरबाबतचे पाच ट्रायल करण्यात आले आहेत. परंतु, रेमडेसिवीरमुळे कोरोनाचे रुग्ण बरे झाले नाहीत आणि कोरोना बळीची संख्याही रोखता आलेली नाही. अजून एका मोठ्या क्लिनीकल ट्रायलच्या निष्कर्षाची आम्ही वाट पाहत आहोत.

त्यावरून रेमडेसिवीर खरोखरच कोरोनावर परिणामकारक आहे का? हे समजून येणार आहे, असं या संशोधकांचं म्हणणं आहे. यापूर्वी देशात रेमडेसिवीरची मागणी वाढल्याने रेमडेसिवीरचा साठा संपला.

स्टॉक संपल्याने या लसीच्या निर्यातीवर भारताने बंदी घातली आहे. भारतात कोरोना रुग्णांवर रेमडेसिवीरचा सातत्याने वापर केला जात आहे.

रुग्णालयात दाखल करण्यात आलेल्या रुग्णावर रेमडेसिवीरचा वापर करण्यात आला होता. परंतु, त्यामुळे रुग्णही बरे झाले नाहीत आणि कोरोना बळींची संख्याही कमी झाली नाही.

त्यामुळे गेल्या वर्षी डब्ल्यूएचओने रुग्णांना रेमडेसिवीर न देण्याचे निर्देश जारी केले होते, असं डॉ. स्वामीनाथन यांनी सांगितले.

आम्ही रेमडेसिवीरचे मोठे क्लिनिकल ट्रायल सुरू केले आहे. काही प्रमाणात रेमडेसिवीरचा परिणाम होत आहे. मात्र, तरीही क्लिनिकल ट्रायलनंतरच अधिक भाष्य करता येईल, असं केरखोव यांनी सांगितलं.

आठवडाभरात अहवाल येणार

काही अभ्यासातून रेमडेसिवीरमुळे रुग्णांवर चांगला परिणाम झाल्याचं दिसून आला आहे. रेमडेसिवीरमुळे कोरोना बळींची संख्याही कमी झाली आहे.

मात्र, अत्यल्प रुग्णांमध्ये हे दिसून आलं आहे. त्यामुळेच आम्ही मोठ्या क्लिनिकल ट्रायलच्या निष्कर्षाची वाट पाहत आहोत. काही आठवड्यांमध्येच हा अहवाल येणार आहे, असे स्वामिनाथन यांनी सांगितले.

डब्ल्यूएचओने रेमडेसिवीरबद्दल प्रतिकूल मत व्यक्त केले असले तरी भारतासह जगातील अनेक देशात रेमडेसिवीरचा वापर केला जात आहे. अमेरिकेतील अनेक संशोधकांनीही रेमडेसिवीरला मान्यता दिली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here