सनी देओलने दिलं स्पष्टीकरण | लाल किल्ल्यावर झेंडा फडकावणाऱ्या दीप सिद्धूचं भाजपा कनेक्शन?

208

देशभरात प्रजासत्ताक दिन साजरा होत असताना राजधानी दिल्ली मात्र, हिंसाचार ढवळून निघाली. शेतकरी आणि पोलीस यांच्यात झालेल्या धुमश्चक्रीनंतर आरोप-प्रत्यारोपांचा रणधुमाळी रंगली आहे. 

ट्रॅक्टर रॅलीला हिंसक वळण लागल्यानंतर शेतकऱ्यांनी लालकिल्ल्यावर निशाण ए साहिब ध्वज फडकावला. त्यावरून बरंच वादंग सुरू असताना दीप सिद्धू हे नाव समोर आलं आहे. 

दीप सिद्धू याने शेतकऱ्यांना भडकावल्याचा आरोप भारतीय किसान युनियनचे हरयाणातील प्रमुख गुरनाम सिंह चाडूनी यांनी केला.

खरंच दीप सिद्धू याने शेतकऱ्यांना भडकावलं का आणि तो कोण आहे, हा प्रश्न उपस्थित होऊ लागला आहे.त्यानंतर दीप सिद्धू याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गुरुदासपुरचे भाजपा खासदार सनी देओल यांच्यासोबतचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होण्यास सुरूवात झाली.

दिप सिद्धूबाबत सोशल मीडियावर अनेक दावे करण्यात येत आहेत. सिद्धू संयुक्त किसान मोर्चाशी संबंधित असल्याचं सुरूवातीला काहींनी म्हटलं. पण नंतर संयुक्त किसान मोर्चाने सिद्धूशी संबंध नसल्याचं सांगितलं.

तर, बॉलिवूड अभिनेता आणि भाजपा खासदार सनी देओल यांचा दीप सिद्धूसोबत जवळचा संबंध असल्याचा दावा अनेकांनी केला आणि दोघांचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले .

2019 मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत सनी देओल यांच्या प्रचाराचं काम दीप सिद्धूने केलं होतं. त्यावेळचे दोघांचे फोटो व्हायरल होत आहेत.

त्यानंतर आता अखेर खासदार सनी देओल यांनी स्वतः स्पष्टीकरण दिलं आहे.  “आज लाल किल्ल्यावर जे झालं, ते पाहून मन खूप दुःखी झालं आहे. मी आधीही 6 डिसेंबरला फेसबुकवरुन स्पष्ट केलं आहे की माझा किंवा माझ्या परिवाराचा दीप सिद्धूसोबत कोणताही संबंध नाही. जय हिंद.” असं ट्विट सनी देओल यांनी केलं.

पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शाह आणि सनी देओल यांच्यासोबतचे फोटो शेअर करुन सिद्धू याचे भाजपाच्या नेत्यांशी जवळचे संबंध असल्याचा दावा विरोधकांकडून केला जातोय.

वरीष्ठ वकील प्रशांत भूषण यांनीही हे फोटो ट्विट करुन भाजपावर आरोप केले. त्यानंतर आता अखेर खासदार सनी देओल यांनी स्वतः स्पष्टीकरण दिलं आहे.

“आज लाल किल्ल्यावर जे झालं, ते पाहून मन खूप दुःखी झालं आहे. मी आधीही 6 डिसेंबरला फेसबुकवरुन स्पष्ट केलं आहे की माझा किंवा माझ्या परिवाराचा दीप सिद्धूसोबत कोणताही संबंध नाही. जय हिंद.” असं ट्विट सनी देओल यांनी केलं.

गेल्या वर्षी सहा डिसेंबर रोजी सनी देओल यांनी, “दीप सिद्धू, जो निवडणुकांच्या वेळी माझ्यासोबत होता, दीर्घ काळापासून माझ्यासोबत नाहीये. 

तो जे करतोय, ते स्वतः करतोय, स्वतःच्या इच्छेनुसार करतोय. त्याच्या कुठल्याही कृत्याशी माझा संबंध नाही”, असं स्पष्टीकरण दिलं होतं.

दरम्यान, सनी देओलने दिलेल्या स्पष्टीकरणानंतरही पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह आणि सनी देओल यांच्यासोबतचे दीप सिद्धूचे फोटो सोशल मीडियावर शेअर होत आहेत.

सिद्धू याचे भाजपाच्या नेत्यांशी जवळचे संबंध असल्याचा आरोप विरोधकांकडून व काही नेटकऱ्यांकडून केला जात आहे. यासाठी अनेक नेत्यासोबत दिसणारे फोटो शेअर केले जात आहेत.

जवळपास दोन महिन्यांपासून शांततेत सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाला ऐन प्रजासत्ताक दिनी गालबोट लागलं. ट्रॅक्टर रॅलीदरम्यान शेतकरी व पोलीस आमने-सामने आल्यानंतर हिंसेचा उद्रेक झाला.

यातच शेतकऱ्यांच्या एका गटाने लाल किल्ल्याकडे कूच करत किल्ल्यावर ध्वज फडकावला. तिरंगा उतरवून ध्वज फडकावल्याचा अफवा पसरल्या होत्या. मात्र, तिरंगा न उतरवता आंदोलक शेतकऱ्यांनी ध्वज फडकावल्याचं नंतर समोर आले.

लाल किल्ल्याजवळ झालेल्या या घटनेनंतर आंदोलक शेतकऱ्यांविरुद्ध टीकेचा सूर उमटला. मात्र, ध्वज फडकावणाऱ्या शेतकऱ्यांना पंजाबी गायक दीप सिद्धू याने भडकावल्याचा आरोप शेतकरी नेत्यांनी केला आहे.

“दीप सिद्धूने शेतकऱ्यांचं नेतृत्व केलं आणि त्यांना लाल किल्ल्याकडे घेऊन गेला. शेतकऱ्यांची लाल किल्ल्याकडे जाण्याची अजिबात इच्छा नव्हती,” 

असं गुरनाम सिंह चाडूनी यांनी म्हटलं आहे. स्वराज इंडियाचे नेते योगेंद्र यादव यांनीही दीप सिद्धू याला लाल किल्ल्यावरील घटनेसाठी जबाबदार ठरवलं आहे.

दीप सिद्धू कोण आणि त्याने खरंच आंदोलक शेतकऱ्यांना भडकावलं का?, असा प्रश्न उपस्थित होऊ लागला आहे. शेतकरी नेत्यांकडून होत असलेल्या आरोपानंतर दीप सिद्धूने भूमिका स्पष्ट केली आहे.

“आंदोलन करण्याच्या लोकशाही अधिकाराचा वापर करूनच आम्ही फक्त निशाण साहिब ध्वज फडकावला. तिरंगा हटवला नव्हता,” दीप सिद्धूने म्हटलं आहे.

दीप सिद्धू कोण आहे?

दीप सिद्ध पंजाबी गायक आणि अभिनेता आहे. १९८४ मध्ये पंजाबमधील मुख्तसार जिल्ह्यात त्याचा जन्म झाला. त्याने कायद्याची पदवी घेतली. किंगफिशर मॉडेल हंट पुरस्कार मिळवण्यापूर्वी तो बार कॉउन्सिलचा सदस्यही राहिला आहे.

२०१५ मध्ये दीप सिद्धूचा रमता जोगी हा पहिला सिनेमा पदर्शित झाला. जोरा दस नबरिया या सिनेमानं त्याला प्रसिद्धीच्या झोतात आणलं.

विशेष सनी देओल यांच्या प्रचारासाठी नियुक्त करण्यात आलेल्या समितीत दीप सिद्धू होता. लाल किल्ल्यावर झालेल्या घटनेनंतर मात्र सनी देओल यांनी ट्विट करून आपला आणि आपल्या कुटुंबाचा दीप सिद्धूशी कोणताही संबंध नसल्याचं म्हटलं आहे

दीप सिद्धू आंदोलनात कसा आला?

शेतकरी आंदोलन सुरू झाल्यानंतर अनेक कार्यकर्ते आणि कलाकार शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ आंदोलनात सहभागी झाले. या कलाकारांमध्ये एक दीप सिद्धूही होता. दिल्ली-हरयाणा सीमेवरील शंबू येथे तो शेतकऱ्यांबरोबर धरणे देत होता.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here