दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी ‘ऑनलाइन’ अर्जासाठी मुदतवाढ

273
Extension for 'online' application for 10th-12th class students

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात येणाऱ्या दहावी-बारावीच्या परीक्षेला खासगीरीत्या प्रविष्ट होणाऱ्या विद्यार्थ्यांना आता नावनोंदणी अर्ज अतिविलंब शुल्कासह ऑनलाइन पद्धतीने शुक्रवार (दि.9 ते रविवार दि.11) दरम्यान भरता येणार आहे, अशी माहिती राज्य मंडळाचे सचिव डॉ. अशोक भोसले यांनी दिली आहे.

राज्य मंडळाच्या वतीने घेण्यात येणाऱ्या दहावी आणि बारावीच्या परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना खासगीरीत्या फॉर्म नंबर १७ भरून परीक्षा देण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे.
एप्रिल-मे २०२१ मध्ये घेण्यात येणाऱ्या परीक्षेसाठी खासगीरीत्या प्रविष्ट होणाऱ्या विद्यार्थ्यांचे नावनोंदणी अर्ज ऑनलाइन पद्धतीने स्वीकारण्यासाठी २८ नोव्हेंबर २०२० ते १० फेब्रुवारीपर्यंतचा कालावधी निश्चित केला होता. आता रविवारपर्यंत अतिविलंब शुल्कासह खासगीरीत्या प्रविष्ट होणाऱ्या विद्यार्थ्यांना अर्ज करता येणार आहे.

ऑनलाइन अर्ज करण्यासाठी संकेतस्थळ

दहावीच्या विद्यार्थ्यांनी येथे क्लिक करा : http://form17.mh-ssc.ac.in
बारावीच्या विद्यार्थ्यांनी येथे क्लिक करा : http://form17.mh-hsc.ac.in

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here