मुंबई : भारतात बहुधा विवाहबाह्य संबंधाच्या प्रकरणांमध्ये पुरुषांचं नाव समोर येते, लग्नानंतरही अनेक पुरुषांचे बाहेरील किंवा इतर स्त्रियांसोबत संबंध असल्याच्या अनेक घटना आपण आजवर पाहिल्या आहेत.
मात्र, हीच गोष्ट एखाद्या स्त्रीनं केली तर आजही समाजासाठी हा एक चर्चेचा विषय ठरतो. हा भेदभाव आजही मोठ्या प्रमाणात अस्तित्वात आहे.
आता एका सर्वेक्षणातून मात्र वेगळीच बाब समोर आली आहे. या सर्वेक्षणानुसार भारतातील विवाहित स्त्रियांच्या अफेअरच्या प्रमाणात मोठी वाढ झाली आहे.
याबाबतचं सर्वेक्षण ‘ग्लिडन’ या फ्रेंच एक्स्ट्रा मॅरिटल डेंटिंग APPद्वारे करण्यात आलं आहे. याचा अभ्यास केला असता ही बाब समोर आली आहे. ग्लिडन हे APP खास अशा महिलांसाठी तयार केलं गेलं आहे, ज्या एकतर आधीपासून रिलेशनशिपमध्ये आहेत किंवा मग विवाहित आहेत.
हे APP महिलांनीच महिलांसाठी तयार केलं असून प्रेम, सेक्स आणि मैत्री याबाबत महिलांना मदत करणं हा याचा उद्देश आहे. विशेष बाब म्हणजे या APP चा भारतात मोठ्या प्रमाणात वापर होतो. या अॅपचे देशात जवळपास 13 लाख वापरकर्ते आहेत.
देशातीतल 30 ते 60 या वयोगटातील महिलांचा या सर्वेक्षणात अभ्यास करण्यात आला. यानुसार 48 टक्के भारतीय महिलांचे विवाहबाह्य संबंध असल्याचं समोर आलं आहे.
आणखी एक विशेष बाब म्हणजे यात केवळ विवाहबाह्य नव्हे तर मुलं झालेल्या महिलांचाही समावेश आहे. महिलांच्या विवाहबाह्य संबंधांसाठी विविध कारणं आहेत.
यातील सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे त्या आपल्या लैंगिक आयुष्याबाबत समाधानी नाहीत. 64 टक्के महिला आपल्या पतीकडून लैंगिक सुख मिळत नसल्यानं विवाहबाह्य संबंध ठेवत आहेत.
विवाहबाह्य संबंधांमध्ये असणाऱ्या 76 टक्के महिला उच्चशिक्षीत असून यातील 72 टक्के महिला स्वावलंबी आहेत, असंही या सर्वेक्षणातून समोर आलं आहे.