Fact Check News | केंद्र सरकार ‘विधवा महिला समृद्धी योजनेअंतर्गत’ 5 लाख रुपये रोख आणि मोफत शिलाई मशिन देणार?

222

सरकारी योजनांबाबत केंद्र सरकारकडून अधिकृत माध्यमांद्वारे माहिती दिली जात असते. पण, सध्या एका युट्यूब व्हिडिओमध्ये दावा करण्यात आला आहे की, केंद्र सरकारने ‘विधवा महिला समृद्धी योजना’ आणली आहे. 

या योजनेअंतर्गत केंद्र सरकार विधवा महिलांना 5 लाख रुपये रोख आणि एक शिलाई मशिन मोफत देत आहे. अशात सामान्य लोकांसाठी हे जाणून घेणं महत्त्वाचं आहे की खरंच सरकारने अशाप्रकारची कोणती योजना आणली आहे का? 

जर सरकारने अशी कोणती योजना आणली नसेल तर मग व्हायरल होणाऱ्या दाव्यामध्ये किती तथ्य आहे? हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला तेव्हा सत्य चक्रावून टाकणारे आहे.

काय आहे सत्य ?

व्हायरल होणाऱ्या युट्यूब व्हिडिओमध्ये जो दावा करण्यात आला आहे तो पूर्णतः खोटा असून केंद्र सरकारची अशी कोणतीही योजना नाहीये. सरकारच्या पत्रसूचना विभागाने (पीआयबी) याबद्दल खुलासा केला आहे.

‘पीआयबी फॅक्ट चेक’ने लोकांना अशाप्रकारच्या खोट्या व फेक बातम्यांपासून सावध रहाण्याचा इशारा दिला आहे.

पीआयबी फॅक्ट चेक :

पीआयबी फॅक्ट चेक केंद्र सरकारच्या पॉलिसी / योजना / विभाग / मंत्रालयांविषयी चुकीच्या माहितीचा प्रसार रोखण्यासाठी कार्य करते.

सरकारशी संबंधित कोणतीही बातमी सत्य किंवा असत्य आहे हे जाणून घेण्यासाठी पीआयबी फॅक्ट चेकची मदत घेतली जाऊ शकते.

कोणीही PIB Fact Check ला संशयास्पद बातमीचा स्क्रीनशॉट, ट्विट, फेसबुक पोस्ट किंवा युआरएल व्हॉट्सअप नंबर 918799711259 वर पाठवू शकतं. याशिवाय, [email protected] या ईमेल आयडीवर मेल देखील करु शकतात.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here