FACT CHECK : 2019 चा फोटो ‘2021’ च्या कोरोनामध्ये ‘का’ व्हायरल होत आहे?

255

सोशल मीडियावर सध्या एक फोटो खूप व्हायरल होत आहे, हा फोटो एरियल व्ह्यू मध्ये घेण्यात आला असून यात हरिद्वारमध्ये कुंभ मेळ्यातील गर्दी स्पष्टपणे दिसत आहे.

सोशल मीडियावर सध्या एक फोटो खूप व्हायरल होत आहे, हा फोटो एरियल व्ह्यू मध्ये घेण्यात आला असून यात हरिद्वारमध्ये कुंभ मेळ्यातील गर्दी स्पष्टपणे दिसत आहे. हा फोटो कुंभ मेळ्यातील असल्याचादावा केला जात आहे.

जैनब सिकंदर सिद्दीकी ट्विटमध्ये म्हटले आहे कि, कुंभ मेळ्याला कोरोनाचे हॉट स्पॉर्ट म्हणता येणार नाही आणि या डेव्होटीजना सुपरस्प्रेडर म्हणता येणार नाही.

जैनबच्या ट्विटला कोट करत बहुजन समाज पार्टीचे एमपी कुंवर दानिश अली यांनी हा फोटो दिल्ली निजामुद्दीनचा नसून उत्तराखंडमधील हरिद्वारचा असे कोट केले आहे.

पत्रकार आरिफ शहा यांनी हा भारतातील कुंभ मेळा आहे, जगातील सर्वात मोठे करोना हॉटस्पॉट असे ट्विट केले आहे.मुंबई युथ काँग्रेसच्या प्रवक्त्यांनी कपड्यांवरून जमात ओळखून दाखवा असे आवाहन त्यांच्या फोल्लोवॉर्सना केले.

खरं काय आहे ?

हा फोटो २०१९ मध्ये त्रिवेणी संगम प्रयागराज येथे काढण्यात आला आहे. हरिद्वार किंवा कुंभमेळ्यात नाही.

कशी केली पडताळणी

‘रिव्हर्स इमेज सर्च ‘ च्या माध्यमातून पडताळल्यानंतर हे कळाले कि, हा फोटो १८ जानेवारी २०१९ रोजी प्रकाशित केला होता. फोटोचे सौजन्य न्यूज एजन्सी पीटीआयला दिले होते. भारतीय साधू- संत संगम येथे पवित्र स्नान करतांना’ असे कॅप्शन देखील या फोटोला देण्यात आले होते. यावर्षशी देखील हजारो भाविक कुंभमेळ्यात सहभागी झाले होते.

निष्कर्ष : फॅक्ट चेक पडताळणीत असे आढळून आले की, प्रचंड गर्दी असलेला हा फोटो २०१९ चा असून चुकीच्या पद्धतीने व्हायरल करण्यात आला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here