‘ताल’ चित्रपटाच्या यशानंतर अक्षयने लग्न करण्याचा निर्णय घेतला होता. अक्षयचे हिंदी चित्रपटसृष्टीतील एका बड्या अभिनेत्रीवर प्रेम जडले पण तिने नकार दिला. त्यामुळे अक्षय खन्ना अद्यापही अविवाहित आहे.
अक्षय खन्नाने वयाची चाळीशी ओलांडली असली तरी त्याने अद्याप लग्न केलेले नाही किंवा त्याचे प्रेमप्रकरण देखील ऐकायला मिळालेले नाही.
अक्षय खन्नाने हिमालय पुत्र या चित्रपटापासून त्याच्या करियरला सुरुवात केली. त्यानंतर बॉर्डर या चित्रपटात तो झळकला.
बॉर्डर या चित्रपटातील भूमिकेमुळे त्याला चांगलीच लोकप्रियता मिळाली. या चित्रपटानंतर अक्षयने कधीच मागे वळून पाहिले नाही.
या चित्रपटातील भूमिकेसाठी त्याला अनेक पुरस्कार देखील मिळाले होते. त्याने या चित्रपटाप्रमाणेच दिल चाहता है, डोली सजा के रखना, ताल, गांधी माय फादर, हमराज़, दिवानगी, गली-गली चोर है, आ अब लौट चलें, हलचल तर अलीकडेच प्रदर्शित झालेल्या दि अकसिडेंटल प्राईम मिनिस्टर यांसारख्या अनेक चित्रपटात खूप चांगल्या भूमिका साकारल्या आहेत.
अक्षय खन्नाने वयाची चाळीशी ओलांडली असली तरी त्याने अद्याप लग्न केलेले नाही किंवा त्याचे प्रेमप्रकरण देखील ऐकायला मिळालेले नाही. त्यामुळे अक्षय कधी लग्न करणार हा प्रश्न त्याच्या चाहत्यांना नेहमीच पडत असतो.
अक्षय खन्नाच्या खाजगी आयुष्याविषयी धक्कादायक माहिती नेहमी सांगितली जाते. ‘ताल’ चित्रपटाच्या यशानंतर अक्षयने लग्न करण्याचा निर्णय घेतला होता. अक्षयचे हिंदी चित्रपटसृष्टीतील एका बड्या अभिनेत्रीवर प्रेम जडले होते.
ही अभिनेत्री म्हणजे करिश्मा कपूर. करिश्मावर अक्षयचं जीवापाड प्रेम होते. त्याने ही बाब वडील विनोद खन्ना यांना सांगितली. त्यांनाही सून म्हणून करिश्मा पसंत होती.
विनोद खाणं करिश्माच्या घरी गेले आणि रणधीर कपूर यांच्याकडे अक्षय-करिश्माच्या लग्नाचा प्रस्ताव ठेवला. करिश्माचे वडील रणधीर यांनाही हा प्रस्ताव मान्य होता. मात्र त्यांची पत्नी बबिता यांना हे मान्य नव्हते.
करिश्मा त्याकाळात एकाहून एक हिट चित्रपट देत होती. आघाडीच्या अभिनेत्रींमध्ये तिची गणना केली जात होती. तिने यशाच्या शिखरावर असताना लग्न करू नये अशी तिची आई बबिता यांची इच्छा होती.
त्यामुळेचं हे लग्न होऊ शकले नाही असे काहींचे म्हणणे आहे तर काहींच्या मते अक्षय ऐवजी करिश्माचे अभिषेक बच्चनसोबत लग्न व्हावे असे बबिता यांना वाटत होते.
त्यांनी अभिषेकसाठी या नात्याला नकार दिला होता. करिश्माचा त्यानंतर अभिषेकसोबत साखरपुडा झाला आणि तो काहीच महिन्यात मोडला होता.
साखरपुडा मोडल्यानंतर करिश्माने संजय कपूर या व्यवसायिकासोबत लग्न केले. पण दोन मुलांच्या जन्मानंतर त्यांनी घटस्फोट घेतला. आजही अक्षय व करिष्मा यांच्या अधुऱ्या प्रेम कहाणीबद्दल चाहते बोलत असतात.