प्रसिद्ध मराठी अभिनेत्री उर्मिला निंबाळकर ही गरोदर असून तिने सोशल मीडियावर तिचे बेब बंपचे फोटो शेअर केले आहेत. या फोटोत उर्मिला अतिशय सुंदर दिसत आहे. तिने या फोटोद्वारे तिच्या प्रेग्नेंसीबाबत चाहत्यांना सांगितले आहे.
1 एप्रिलला उर्मिलाने तिच्या प्रेग्नेन्सीबाबत जाहीर केले. तिने तिच्या नवऱ्यासोबचे फोटोशूट शेअर केले आहे. सोबत तिने ”आम्ही गरोदर आहोत. मात्र हे एप्रिल फूल नाही” अशी मिश्कील कॅप्शन देखील दिली आहे.
उर्मिलाने अनेक मराठी व हिंदी मालिकांमध्ये काम केले आहे. ‘दुहेरी’ ही तिची गाजलेली मराठी मालिका असून तिने ‘दिया और बाती हम’,’मेरी आशिकी तुमसे ही’ या हिंदी मालिकांमध्येही काम केले आहे.