शेतकरी जर ‘हिंसक’ झाले तर सर्व जबाबदारी भाजप सरकारची असेल | शरद पवार

165

नवी दिल्ली : दिल्लीत मागील दोन महिन्यांपेक्षा जास्त काळापासून सुरु असलेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनावर अद्यापही तोडगा निघालेला नाही.

सर्वसामान्य जनतेला इंधन दरवाढीचा फटका पडला आहे. पण या समस्या कशा वाढतील यावर मोदी सरकारचे लक्ष आहे. आज भारत सरकार यावर लक्ष देत नाही.

  • ‘आतापर्यंत शांत असलेले शेतकरी जर हिंसक झाले तर सर्व जबाबदारी भाजप सरकारची असेल,’ अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. दिल्लीत झालेल्या पत्रकार परिषदेत शेतकरी आंदोलन, इंधनदरवाढीच्या मुद्द्यावरुन मोदी सरकारवर टीका केली.

पेट्रोलियम पदार्थांवर जास्त उत्पन्न घेत आहे. पेट्रोल-डिझेल दरवाढीमुळे देशातील जनता नाराज आहे, असं शरद पवार म्हणाले.

पंतप्रधान शेतकऱ्यांना भेटत नाहीत ही खेदाची बाब

देशाचे पंतप्रधान 20 ते 30 किमी अंतरावर असलेल्या शेतकऱ्यांना भेटायला जाऊ शकत नाही हे खेदाची बाब आहे. आज ज्यांच्या हातात देशाची सत्ता आहे त्यांना नागरिकांच्या समस्यांशी काही घेणं देणं नाही.

दिल्लीच्या सीमेवर शेतकरी अनेक दिवसांपासून आंदोलन करत आहेत. आज जे शांततेत आंदोलन आहे ते जर वाढले तर त्याला वेगळं वळण लागेल आणि यासाठी जबाबदार भाजप सरकार असेल.

हे सरकार संवेदनशील नाही. विरोधी पक्षातील नेते आज आंदोलक शेतकऱ्यांची भेट घ्यायला जाणार होते मात्र त्यांना भेटू दिलं गेलं नाही. शेतकऱ्यांना जे अडथळे निर्माण केले आहेत हे आजवर कधी झालं नाही.

आज शेतकऱ्यांना जी वागणूक मिळत आहे त्यामुळे देशासमोर एक संकट उभं राहणार आहे. लोकशाहीसाठी हे धोकादायक आहे. संसदेत काही झालं नाही. शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर चर्चा केली नाही, असंही शरद पवार यावेळी म्हणाले.

विदेशी सेलिब्रिटींच्या ट्वीटबद्दल काय म्हणाले?

‘शेतकऱ्यांची समस्या आंतरराष्ट्रीय बनली आहे त्यावर बाहेरचं कुणी बोलावं याचं समर्थन नाही. मात्र देशाच्या सरकारने शांत राहणे आणि इथली समस्या बाहेर गेली हे योग्य नाही.’ असेही पवार म्हणाले.

देशात सुरु असलेल्या असलेल्या शेतकरी आंदोलनावर पॉपस्टार रिहाना, सामाजसेविका ग्रेटा थर्नबर्र, मिया खलिफा यांनी भाष्य केले, या प्रश्नावर त्यांनी वरील प्रतिक्रिया दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here