शेतकरी कात्रीत सापडला : कोणी उधार देत नाही आणि बँकेत पैसे असूनही काढता येत नाही !

295

कोरोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी लावण्यात आलेल्या लॉकडाऊनने शेतकऱ्यांची एक वेगळीच कोंडी केली आहे. पंतप्रधान सन्मान निधीचे पैसे खात्यात आले पण ते काढता येत नाहीत.

मात्र लॉकडाऊनमुळे शेतकऱ्यांना ही रक्कम काढता येत नाही. कारण काही बँक सुरु तर काही बंद आहेत. बँकेत कोरोनामुळे सोशल डीसटन्सच्या नावाखाली लांब रांगा लागल्या आहेत.

शेतीसाठी बि बियाणे खरेदीसाठी हातात रोख रक्कम नसल्याने शेतकऱ्याला खते, बी-बियाणे खरेदी करता येत नाही. बँकेत गेले तर हातात पैसे यायची शक्यता नाही.

आडत बाजारातील व्यापारी हात आखडता घेत आहेत. गाव खेड्यातील सावकार उधार उसनवार पैसे देत नाही, त्यमुळे खरीप हंगामाची तयारी अर्धवट राहिली असून शेतकरी चिंतेत पडला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here