महापोर्टलवर ‘शेतकरी योजना’ या सदराखाली शेतकऱ्यांच्या सोयीकरीता सर्व योजनांचा लाभ एकाच अर्जाद्वारे देण्याच्या दृष्टीने अर्ज करण्यापासून ते प्रत्यक्ष लाभ मिळणे पर्यंत एकात्मिक संगणक प्रणाली विकसित केली आहे.
या प्रणालीद्वारे शेतकऱ्यांना त्यांच्या पसंतीच्या बाबींच्या निवडीचे स्वातंत्र्य देण्यात आले असून शेतकऱ्यांनी शेती निगडीत विविध बाबींकरिता अर्ज करावयाचे आहे.
राज्य शासन महाडिबीटी पोर्टलवर ‘शेतकरी योजना’ या शीर्षकांतर्गत बियाणे या घटकाचा लाभ घेण्यासाठी अर्ज करण्याची सुविधा उपलबध करून देण्यात आली आहे.
या सुविधा अंतर्गत लाभार्थीना राष्ट्रीय अन्नरक्षा अभियान या योजनेतील सोयाबिन, भात, तूर, मूग, उडीद, मका व बाजरी इत्यादी बियाणे अनुदानवर उपलबध होणार असून दि. 15 मे 2021 पर्यंत शेतकऱ्यांनी अर्ज करणे बंधनकारक आहे.
- महाडिबिटी पोर्टलचे https://mahadbtmahait.in हे संकेतस्थळ आहे. या संकेतस्थाळवर ‘शेतकरी येाजना’ हा पर्यान निवडावा. शेतकरी स्वतःच्या मोबाईल, संगणक, लॅपटॉप, टॅबलेट, सामुदायिक सेवा केंद्र (CSC), ग्रामपंचायतील संग्राम केंद्र इत्यादी माध्यमातून वरील संकेतस्थळावर जाऊन अर्ज करू शकतील.
वैयक्तिक लाभार्थी म्हणून नोंदणी करू इच्छिणाऱ्या सर्व शेतकऱ्यांना त्यांचा आधार क्रमांक या संकेत स्थळावर प्रमाणित करून घ्यावा लागेल.ज्या वापरकर्त्यांकडे आधार क्रमांक नसेल त्यांना अर्ज करता येईल.
अर्जदारांना अनुदान वितरित करण्यापूर्वी महाडिबिटी पोर्टलमध्ये त्यांना देण्यात येणारा आधार क्रमांक नोंदणीकृत करून घ्यावे लागेल त्याशिवाय त्यांना अनुदानाचे वितरण करण्यात येणार नाही.
या कामासाठी आपण आपल्या जवळच्या सामुहिक सेवा केद्राची मदत घेऊ शकता तसेच यामध्ये कोणतीही तांत्रिक अडचण आल्यास [email protected] या मेलवर किंवा 020-25511479 या दूरध्वणी क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी लातूर यांनी केले आहे.