समाजात जवळच्या नात्यातील अनैतिक संबंधित घटना नेहमी घडतात. त्या नात्यांना समाजमान्यता नसली तरी वासनांध झालेल्याना नात्याचे पावित्र्य कळत नाही. त्यातून आपले अनैतिक नाते लपविण्यासाठी गुन्ह्यांचा आधार घ्यावा लागतो. या अनैतिक नात्यात नात्यांचाच खून होतो.
सासरा आणि सुनेच्या पवित्र नात्यात वासनेचा शिरकाव झाला आणि हे पवित्र नाते कलंकित झाले. सुनेच्या प्रेमात पडलेल्या सासऱ्याने असा काही गुन्हा केला आहे की त्याच्यावर पोलिसांचा देखील विश्वास बसत नव्हता मात्र सासऱ्याने व सुनेने गुन्ह्याची कबुली दिली आहे, तेव्हा पोलीस देखील चक्रावून गेले.
माणुसकीला व सामाजिक बंधनाला काळिमा फासणारी घटना पश्चिम राजस्थानमधून समोर आली आहे. जैसलमेर जिल्ह्यात एका सासऱ्याने आपल्याच सुनेसोबत सुरू असलेल्या अनैतिक संबंधात अडथळा ठरणाऱ्या मुलाला विजेचा शॉक देऊन त्याची हत्या केली. आपल्या सुनेसोबत अनैतिक संबंध कायम सुरू रहावेत म्हणून वडिलानी चक्क मुलाचा मुडदा पाडला, अतिशय धक्कादायक गोष्ट म्हणजे या पापात त्याला सूनेची देखील मदत मिळाली.
उपलब्ध माहितीनुसार वडिलांनी मुलाला शॉक देण्याआधी मृत व्यक्तीच्या पत्नीने त्याला लिंबाच्या सरबतातून झोपेच्या गोळ्या दिल्या. त्यामुळे पती बेशुद्ध झाला. दहा दिवसांआधी झालेल्या या हत्याकांडाचा बुधवारी पर्दाफाश झाला आहे.
हा गुन्हा जेव्हा उजेडात आला तेव्हा ऐकणाऱ्यांच्या पायाखालची जमीनच सरकली. पोलिसांनी आरोपी वडील आणि त्याच्या सूनेला अटक केली आहे. पोलीस आता पुढील तपास करत आहे.
नाचना पोलीस अधिकारी हुकमाराम बिश्नोई यांनी सांगितले की, ही घटना आसकन्द्रा गावातील आहे. १० दिवसांपूर्वी इथे एक तरूण हिरालाल मेघवाल यांचा संशयास्पद मृत्यू झाला होता. कुटुंबियांनी तरूणावर अंत्यसंस्कार केले होते.
मात्र मृतक हिरालालच्या लहान भावाने हत्येची शंका व्यक्त करत तक्रार दाखल केली. त्यानंतर पोलिसांनी मृतकाचा दफन केलेला मृतदेह दफनभूमीतुन बाहेर काढून मेडिकल बोर्डने त्याचे पोस्टमार्टम केले. या भागात मेघवाल समाजातील लोकांचे मृतदेह दफन करण्याची परंपरा आहे.
त्यानंतर पोलिसांनी घटनेची चौकशी सुरू केली तेव्हा अनेक धक्कादायक खुलासे झाले. पोलिसांनी जेव्हा हिरालालची पत्नी पारलेची चौकशी केली तर पूर्ण घटनेचा उलगडा झाला. पोलिसांनी आपला हात दाखवताच चौकशी दरम्यान पारलेने स्विकारले की, तिने तिचे सासरे मुकेश कुमारसोबत मिळून हिरालालची हत्या केली.
हिरालालच्या पत्नीने पोलिसांना सांगितले की, घटनेच्या रात्री त्याने लिंबू सरबतात झोपेच्या गोळ्या मिसळून त्याला सरबत पाजले. त्यानंतर तो काही वेळातच बेशुद्ध झाला. नंतर दोघांनी मिळून म्हणजे सून आणि सासऱ्याने मुलाला शॉक देऊन त्याची हत्या केली. या घटनेनंतर संतापाची लाट उसळली आहे, तर पुढील तपास पोलीस करीत आहेत.