बापाने आपल्या अडीच वर्षांच्या मुलाला 40 हजार रुपयांना विकले; धक्कादायक कारण समोर आले

287
CRIME news

गुवाहाटी : एक संतापजनक प्रकरण नुकतेच समोर आले आहे. या प्रकरणात एका व्यक्तीने आपल्या अडीच वर्षांच्या मुलाला 40 हजार रुपयांना विकले आहे.

नराधम बापाने आपल्या मुलाला ड्रग्स खरेदी करण्यासाठी विकल्याचे समोर आले आहे. ही धक्कादायक घटना आसाममधील आहे.

आरोपीच्या पत्नीने दिलेल्या तक्रारीनंतर पोलिसांनी मुलाच्या वडिलांना आणि त्याला विकत घेणाऱ्या महिलेस अटक केली आहे.

आसाममधील गुवाहाटीपासून 80 किमी अंतरावर मोरीगावमधील लहरीघाट येथे ही घटना घडली.

अमीनुल इस्लाम नावाच्या व्यक्तीने आपला अडीच वर्षांचा मुलगा साजिदा बेगम नावाच्या महिलेला विकला.

मुलाची आई रुक्मिना बेगमने पोलिसात तक्रार दाखल केली. त्यानंतर पोलिसांनी अमीनुल आणि साजिदाला अटक केली.

मिळालेल्या माहितीनुसार, काही महिन्यांपूर्वी रुक्मिना आणि अमीनुल यांचे भांडण झाले होते. हे भांडण अमीनुलच्या अंमली पदार्थांच्या तस्करीच्या सवयीमुळेही झाले होते.

त्यानंतर ती पतीला सोडून वडिलांच्या घरी राहायला निघून गेली. ती अनेक महिन्यांपासून माहेरीच राहत होती.

एक दिवस अमीनुल रुक्मिनाच्या वडिलांच्या घरी पोहोचला. त्याने आपले आधार कार्ड बनवायचे आहे असे सांगून मुलाला सोबत घेतले.

मात्र, तो तीन -चार दिवस घरी परतला नाही. यानंतर, जेव्हा रुक्मिणीने चौकशी केली, तेव्हा त्याने आपल्या मुलाला पैशांसाठी विकल्याचे समोर आले. 5 ऑगस्ट रोजी रुक्मिणाने पोलिसात तक्रार दाखल केली.

पोलीस तपासात असे समोर आले की, अमिनुलने आपल्या मुलाला मादक पदार्थांचे व्यसन पूर्ण करण्यासाठी 40,000 रुपयांना विकले. पोलिसांनी मुलाला त्याच्या आईच्या ताब्यात दिले असून आरोपीला अटक केली आहे.

Also Read 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here