कोरोनाचा नवा प्रकार असल्याची भीती | अलिगढ मुस्लीम विद्यापीठात २० दिवसांत १९ प्राध्यापकांचा मृत्यू

198
coroana

नवी दिल्ली : अलिगढ मुस्लिम विद्यापीठातील मागील २० दिवसांमध्ये १९ प्राध्यापकांची मृत्यूने विद्यापीठ प्रशासन हादरून गेले आहे. 

त्यामुळे कोरोनाचा आणखी एक नवा प्रकार विकसित झाला असल्याचा संशय विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. तारिक मंसूर यांनी शंका व्यक्त केली आहे. यासंदर्भात आईसीएमआरला पत्र पाठवून कोरोनाच्या या नव्या विषाणुची तपासणी करावी, असे नमूद करण्यात आली आहे.

विद्यापीठाचे कुलगुरू मंसूर यांनी आईसीएमआर महासंचालक प्रा. बलराम भार्गव यांना पत्र पाठवले आहे. पत्रमध्ये म्हंटलं आहे की, विद्यापीठाच्या प्रयोगशाळेत कोरोनाच्या नमुन्यांचे विश्लेषण करण्यासाठी आईसीएमआरमधील संबंधित विभागाला सूचना द्यावी. त्यातून कोरोनाच्या नव्या प्रकाराचा विकास झालेला आहे का? त्यातून कोरोनाचा आजार बळवतो का? याची उत्तरे मिळतील.

पत्रामध्ये कुलगुरू आईसीएमआरच्या संचालकांना पत्रात सांगतात की, “ही बाब यासाठी आम्ही सांगतो आहोत की, १६ प्राध्यापक, अनेक सेवानिवृत्त शिक्षक आणि कर्मचारी विद्यापीठाच्या आसपास राहत होते. कोरोनामुळे त्यांचे निधन झाले आहे. असं म्हंटलं जातं आहे की, विद्यापीठाच्या परिसरातील सेट सिविच लाईंस भागात कोरोनाचा विशेष प्रकारचा विषाणू पसरला आहे.”

अलिगढ शहाराती सिव्हील लाईंस भागावर व्यक्त केलेल्या शंकेला पाहाता इंडियन काऊन्सिंग ऑफ मेडिकल रिसर्चद्वारे संचलित असणाऱ्या नेहरू मेडिकल काॅलेजमधील मायक्रोबायोलाॅजी विभागाच्या कोव्हिड प्रयोगशाळेद्वारे एकत्रितपणे कोव्हिज नमुन्यांना व्हायरल जिनोमच्या परिक्षणासाठी आणि त्यावरील संशोधनासाठी सीएसआईआर इन्स्टिट्यूट ऑफ जीनोमिक्स एण्ड एंटिग्रेटिव्ह बायोलाॅजी, नवी दिल्ली येथे पाठविण्यात आले आहे.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here