महिला शिक्षिका अकरावीच्या विद्यार्थ्याला घेऊन फरार, पालकांनी पोलिसांकडे नोंदवली तक्रार

820

पानीपत : गुरुला देव आणि आई वडिलांपेक्षा मोठा दर्जा देण्यात आला आहे. गुरू आणि विद्यार्थी यांचे नाते पवित्र मानले जाते.

मात्र एका कलयुगी गुरूने हे नाते खराब केले. विद्यार्थी आणि शिक्षक यांच्या नात्याला काळीमा फासणारी घटना हरियाणा येथील पानीपत येथे घडली आहे.

सविस्तर वृत्त असे की, एक खासगी ट्युशन टीचर आपल्या १७ वर्षीय विद्यार्थ्याला घेऊन फरार झाल्याची तक्रार करण्यात आली आहे. या प्रकरणी पोलिसांत पालकांनी तक्रार नोंदवली आहे.

विद्यार्थ्याला घेऊन फरार झालेली महिला शिक्षिका घटस्फोटीत आहे. खासगी शाळेत ‘टीचर’ म्हणून काम करत असलेली ही शिक्षिका आपल्या माहेरीच राहात होती. काही विद्यार्थ्यांची शिकवणी घेऊन आपला उदरनिर्वाह करीत होती.

तक्रारीत विद्यार्थ्याच्या वडिलाने म्हटले की, त्यांचा मुलगा रोजच्या प्रमाणे २९ मे रोजी दुपारी २ वाजता ट्युशनसाठी गेला होता. मात्र त्यानंतर तो परत आलाच नाही.

दरम्यान विद्यार्थ्याच्या घरच्यांनी सुरुवातीला बराच वेळ वाट पाहिली. त्यानंतर महिला शिक्षिकेच्या पित्याने आपली मुलगी देखील गायब असल्याचे सांगितले, त्यानंतर अधिक चौकशी केल्यानंतर टीचर व विद्यार्थ्यामध्ये नाजूक नाते निर्माण झाल्याने दोघे फरार झाल्याचे समोर आले.

अल्पवयीन विद्यार्थी मागील दोन वर्षांपासून महिलेकडे शिकवणीसाठी जात आहे. लॉकडाऊनमध्ये शाळा बंद झाल्यामुळे विद्यार्थी शिक्षिकेच्या घरी चार ते पाच तास शिकवणीसाठी जात होता. या दरम्यान त्यांच्यात जवळीक निर्माण झाली व त्यातून दोघांनी हे पाऊलं उचलले असावे असे बोलले जात आहे.

पोलिसांनी या प्रकरणी महिला शिक्षिकेवर अपहरणाचा गुन्हा दाखल केला असून दोघांचा शोध घेण्यात येत आहे. गायब झाल्यापासून शिक्षिका आणि विद्यार्थ्याचा फोन स्वीचऑफ येत आहे.

मात्र दोघेही अचानक २९ मे रोजी गायब झाले आहेत. विशेष म्हणजे घरून निघून जाताना दोघांनी सोबत काहीही सामान नेलं नाही. केवळ महिला शिक्षिकेच्या हातात सोन्याची अंगठी आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here