शेतकऱ्यांचे खतावरील अनुदान व्यापारीच लुटतायत, खत खरेदीनंतर शेतकऱ्यांनी काय करावे, जाणून घ्या !

405
Fertilizer bag

लातूर : केंद्र सरकारने खतांच्या कंपन्यांनी खतांच्या किंमती वाढल्यावर शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी अनुदान दिले. मात्र हे अनुदान आता व्यापारीचं लुटून खात असल्याचे निदर्शनास आले आहे.

राज्यभरातल्या शेतकऱ्यांना सावध करणारी बातमी आहे. खत विक्रेते शेतकऱ्यांच्या नावावर सरकारलाच फसवतअसल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय.

व्यापारी शेतकऱ्यांना कसे फसवत आहेत, सरकारला लुटत आहेत. संपूर्ण प्रकरण काय आहे, हे आपण जाणून घेणार आहोत.

खत सबसिडीत महाघोटाळा 

शेतकरी जेव्हा खत विक्रेत्याकडून खताची एकच पिशवी घेतो. तेव्हा खरेदीची प्रक्रिया पूर्ण झाल्यावर शेतकऱ्याला मोबाईलवर एक मेसेज येतो.

शेतकऱ्याने किती खत खरेदी केला याची माहिती दिलेली असते. आता व्यापारी शेतकऱ्यांची माहिती घेऊन जास्त खरेदी केल्याचे दाखवत आहेत.

एक खताची बॅग घेतलेल्या शेतकऱ्यांना २५, ४०, ४५ बॅग घेतल्याचा मेसेज आल्याच्या घटना उघडकीस आला आहेत. धुळे जिल्ह्यात शरद पाटील या शेतकऱ्याला १ बॅग खरेदी केली असताना 45 बॅग खरेदीचा मेसेज आला.

प्रत्यक्षात हिशोब केला तर या एकूण 45 बॅग ची बिलाची रक्कम ही 43 हजार 590 इतकी होते आणि यावर एकूण 21 हजार 720 रुपयांचे अनुदान मिळाल्याचा मेसजेमध्ये उल्लेख होता.

पाटील यांनी संबंधित दुकानदाराकडे या सर्व प्रकरणाची चौकशी केली. त्या दुकानदाराला जाब विचारला. मात्र, चौकशी केल्यावर दुकानदाराने नेहमीप्रमाणे उडवाउडीवीची उत्तरे द्यायला सुरुवात केली. दुकानादाराने पाटील यांना परत पाठवले.

त्यानंतर पाटील यांना या प्रकरणात काहीतरी गोलमाल असल्याचा संशय आला. या घोटाळ्याची जिल्हाधिका-यांकडे तक्रार केली असून या प्रकरणी कृषी विभागाने चौकशीची आदेश दिले आहेत.

कदाचित हे एक उदाहरण असू शकते मात्र व्यापाऱ्यांची वागणूक पाहता हे सार्वत्रिक असू शकते. सरकारी अनुदान लाटण्याच्या घटना राज्यात अनेक ठिकाणी घडत असण्याची शक्यता आहे.

शेतकऱ्यांच्या नावावर बनावट बिले तयार करुन कोट्यवधींचे अनुदान लाटले जात असेल. त्यासाठी शेतकऱ्यानी खत खरेदी केल्यावर बिल तपासून पाहावे. हातात दिलेले बिल, मोबाईलवर आलेला मेसेज पडताळून पहावे.

बिल व मेसेज यात काही तफावत किंवा काही गडबड वाटली तर दुकानदाराला कारण विचारा जर ऐकत नसेल तर जिल्हाधिकारी, कृषि अधिकारी यांच्याकडे तक्रार करावी, असे आवाहन शेतकऱ्यांना करण्यात येत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here