अफेअरची चर्चा रंगली आणि स्वानंदी बेर्डेने ‘ती’ पोस्ट डिलीट केली !

316

मुंबई : दिवंगत अभिनेते लक्ष्मीकांत बेर्डे यांचा मुलगा अभिनय बेर्डे यानं सिनेसृष्टीत पदार्पण केल्यानंतर त्याच्यापाठोपाठ आता त्याची बहीण स्वानंदी बेर्डेही मराठी चित्रपटात पदार्पण करत आहे. 

त्यामुळं ती सध्या चर्चेत आहे. असं असलं तरी ती तिच्या खासगी आयुष्यामुळंही अनेकदा चर्चेत असते. नुकताच तिनं शेअर केलेल्या एका पोस्टमुळं चर्चांना उधाण आलं होतं.

स्वानंदीनं एका खास व्यक्तीसोबत फोटोशेअर करत भावुक अशी पोस्ट लिहिली होती.पण सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर तिच्या अफेर्सच्या चर्चा रंगल्या. त्यामुळं तिनं ही पोस्ट डिलीट केली आहे.

Swanandi Berde - WikiBioPic - Wiki Biography Pictures
काय होती स्वानंदीची पोस्ट?

स्वानंदीनं प्रेम मोदी या तरुणासोबतचा फोटो शेअर करत भावुक पोस्ट लिहिली होती. ‘तुझ्या चेहऱ्यावरंच हे हास्य पाहण्यासाठी मी काहीही करायला तयार आहे.

आयुष्यातील कठिण काळात आपण एकमेकांसोबत होतो. तो काळा आपल्याला जवळ घेऊन आला. मला तुझी इतकी सवय झालीए की, एकटं रहायलाही भीती वाटतेय. खूप प्रेम’ असं स्वानंदीनं तिच्या पोस्टमध्ये म्हटलं होतं.

मन येड्यागत झालं

यंदा रसिकांना मोठ्या पडद्यावर वेगळ्या जोड्या पाहायला मिळणार आहेत. स्वानंदी बेर्डे आणि सुमेध मुद्गलकर या जोडीचा ‘मन येड्यागत झालं’ हा चित्रपटही रसिकांसमोर येणार आहे.

रोमँटिक कॉमेडी प्रकारच्या या चित्रपटात ही फ्रेश जोडी दिसणार असल्याचं नुकतंच संदीप जोशी यांनी सोशल मीडियावर जाहीर केलं. त्यामुळे या चित्रपटाबद्दलची उत्सुकता वाढली आहे.

Laxmikant Berde's Daughter Swanandi Berde to make a debut - Marathi - YouTube

‘व्हेंटीलेटर’,’मांजा’ आणि ‘बकेट लिस्ट’ यानंतर सुमेधचा हा चौथा मराठी चित्रपट ठरणार आहे; तर स्वानंदीसाठी हा पदार्पणाचा चित्रपट ठरण्याची शक्यता आहे.

स्वानंदीनं काम केलेला किशोर बेळेकर दिग्दर्शित आणखी एक चित्रपट तयार आहे. यातला जो चित्रपट आधी प्रदर्शित होईल, तो तिच्यासाठी पदार्पणाचा चित्रपट ठरणार आहे.

‘मन येड्यागत झालं’ या चित्रपटाचं चित्रीकरण २०१८ मध्येच झालं असून २०२० मध्ये तो प्रदर्शित होणार होता. करोनामुळे त्याचं प्रदर्शन लांबणीवर गेलं.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here