नवी दिल्ली : आफ्रीन फातिमा ही २३ वर्षाची विद्यार्थिनी, सामाजिक कार्यातही आघाडीवर आहे.
तिने ४ जुलैला मुस्लीम महिला यांची भारतात होणारी छळवणूक विषयावरील ऑनलाईन फोरममध्ये भाग घेतला होता.
मात्र तिने काही वेळात हा ऑनलाईन सेशन आवरता घेतला. कारण तिच्या मोबाईलवर मेसेजेसचा पाऊस पडला होता.
या मेसेजेसमध्ये आफ्रीनला ऑनलाईन लिलावात ठेवले असल्याचे सांगण्यात आले. अशा प्रकारे ध्यानीमनी नसताना ऑनलाईन विक्रीसाठी ठेवण्यात आलेली आफ्रीन ही एकटी महिला नव्हती.
या प्रकारे ८० मुस्लीम महिला आणि त्यांचे फोटो, ज्यात विद्यार्थी, चळवळीत काम करणाऱ्या स्त्रीया आणि पत्रकार महिलांचा समावेश होता. या सर्वांचे फोटो सुली डील या अॅपवर अपलोड करण्यात आले होते.
ज्यांनी अॅपची निर्मिती केली त्यांनी सुली या शब्दप्रयोग वापरला. हा शब्दप्रयोग उजव्या विचारसरणीचे कथाकथीत हिंदू ट्रोलर्स मुस्लीम महिला विषयी वापरात.