लव्ह जिहाद कायदा लागू झाल्यानंतर तीन दिवसांत पहिला गुन्हा दाखल; आरोपीला अटक

53

गांधीनगर : उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेशानंतर गुजरातनेही लव्ह जिहाद कायदा लागू केला आहे. 15 जून रोजी गुजरातमध्ये या कायद्यांतर्गत पहिला गुन्हा दाखल झाला आहे.

लव्ह जिहाद कायदा अंमलात आल्यानंतर अवघ्या तीन-चार दिवसांत पहिला गुन्हा नोंदला गेला आहे. गुजरातमधील वडोदरा येथील तारसाळी भागातील एका 25 वर्षीय मुस्लिम व्यक्तीने ख्रिश्चन असल्याचे भासवून एका 25 वर्षाच्या हिंदू मुलीशी लग्न केले.

जेव्हा मुलीला वास्तव कळले तेव्हा संबंधित हिंदू मुलीने तक्रार दाखल केली. त्यानंतर ‘गुजरात धर्म स्वातंत्र्य (सुधारणा) अधिनियम 2021’ अर्थात लव्ह जिहाद कायद्याच्या उल्लंघनाबद्दल गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली आहे. ‘झी न्यूज’ने याबाबत वृत्त दिले आहे.

या प्रकरणाची माहिती बडोद्याचे गोत्री पोलिस स्टेशनचे निरीक्षक एस. व्ही. चौधरी यांनी दिली. हिंदू मुलीने दिलेल्या तक्रारीनुसार समीर अब्दुलभाई कुरेशी नावाच्या युवकाने तिच्याशी इंस्टाग्रामच्या माध्यमातून मैत्री केली.

त्याचे नाव सॅम मार्टिन आहे असे सांगून त्याने ख्रिश्चन असल्याची बतावणी केली. त्यानंतर त्याने तिला आपल्या प्रेमाच्या जाळ्यात ओढले आणि लैंगिक संबंध ठेवण्यास भाग पाडले.

तसेच, त्या दरम्यानच्या खासगी क्षणांचे फोटो व व्हीडीओ काढले. तरूणाने तिला फोटो दाखवून ब्लॅकमेल करायला सुरुवात केली. त्याच्याशी लग्न केले नाही तर त्याने फोटो व्हायरल करण्याची धमकी दिली. 2019 मध्ये या जोडप्याचे लग्न झाले.

लग्नानंतर मुलीला समजले की सॅम मार्टिन हा समीर अब्दुलभाई कुरेशी आहे. त्यानंतर मुलीने पोलिसांत तक्रार दाखल केली. ‘गुजरात धर्म स्वातंत्र्य (सुधारणा) अधिनियम 2021’ अन्वये कलम 376, 377, 504, 506 (2) आणि कलम (4) अन्वये पोलिसांनी एका आरोपीला अटक केली आहे. बडोदाचे डीसीपी जयराजसिंह वाला यांनी याबाबत माहिती दिली.

हे जरूर वाचा :

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here