अखेर शीतल आमटेंच्या मृत्यूचे खरे कारण कळले | वाचून धक्का बसेल !

194

मुंबई : महारोगी सेवा समितीच्या सीईओ डॉ. शीतल आमटे – करजगी यांच्या मृत्यू प्रकरणाला बुधवारी ३० डिसेंबर रोजी एक महिन्याचा कालावधी पूर्ण झाला. 

३० दिवसानंतरही या मृत्यू प्रकरणाचा शोध सुरूच आहे. अशातच एक धक्कादायक माहिती समोर येत आहे. याबाबत चंद्रपूर पोलिसांनी बुधवारी पत्रकार परिषद घेवून आतापर्यंतच्या तपासातील बाबी सांगितल्या.

डॉ. शीतल आमटे यांचा मृत्यू श्वास गुदमरून मृत्यू झाल्याचा प्राथमिक अहवालातील निष्कर्ष असल्याची माहिती यावेळी बोलताना चंद्रपूर जिल्हा पोलीस अधिक्षक अरविंद साळवे यांनी सांगितली.

आत्महत्येपूर्वी त्यांनी नागपुरातील औषधविक्रेत्याकडून कुत्रे अल्सरच्या त्रासाने पीडित असल्याचे कारण सांगून नेक्युरोन, केसोल व मेडझोल असे तीन प्रकारचे प्राणघातक इंजेक्शन प्रत्येकी पाच नग मागविले. धक्कादायक बाब म्हणजे यापूर्वी हे इंजेक्शन आनंदवनातील रूग्णालयात वापरले गेलेले नाही.

आतापर्यंत करण्यात आलेल्या तपासात डॉ. शीतल आमटे यांनी विषारी इंजेक्शन घेत आत्महत्या केल्याचे निष्पन्न झाल्याची माहिती होती.

मृत्युच्यादिवशी नेमकं काय घडलं होतं?

आनंदवनात डॉ. शीतल यांच्या शयन कक्षातून सकाळपासून बाहेर आल्या नसल्याची माहिती त्यांच्या घरी काम करणाऱ्या महिलेला मिळाली.

त्यांच्या घरी काम करणाऱ्या महिला सविता बोपसे यांनी शीतल बाहेर का आल्या नाही? म्हणून शीतल यांच्या शयन कक्षात प्रवेश केला.

त्यावेळी त्यांना डॉ. शीतल या बेशुद्ध अवस्थेत दिसल्या. घर काम करणाऱ्या सविता बोपसे यांनी शीतल यांचे पती गौतम करजगी यांना बोलावून आणले. शीतल यांच्या भोवती काही औषधे पडल्याचे त्यावेळी लक्षात आले.

शीतल आमटे त्यांच्या आनंदवन येथील घरी बेशुद्धावस्थेत सापडल्याने. त्यांना चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी नेले असता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी मृत घोषित केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here