उदगीर दगडफेक प्रकरणी पाच अटकेत | एका आरोपीकडून चलनातून बाद झालेल्या दहा लाखाच्या नोटा जप्त

424

उदगीर : शहरात मंगळवारी (दि.१९) विविध ठिकाणी दगडफेक करणाऱ्या आरोपींवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

आता पोलिसांनी त्यांची धरपकड मोहीम शहर पोलिसांनी सुरू केली आहे. बुधवार (दि.२०) पाच आरोपींना अटक करण्यात आली.

अटक केलेल्या आरोपी मध्ये साबेर याहिया पटेल, मुसा बागवान, मिर्झा पाशा बेग, शादुल निजाम शेख, अमीर अब्दुल रज्जाक चाऊस अशी अटक केलेल्या आरोपींची नावं आहेत.

महत्त्वाचं म्हणजे अटक केलेल्या आरोपींपैकी एकाकडे चलनातून बाद झालेल्या एक हजारांच्या दहा लाख किंमतीच्या नोटा पोलिसांनी जप्त केल्या आहेत.

या नोटा सापडल्यामुळे या प्रकरणाला आता वेगळे संदर्भ जोडले गेले आहेत. या नोटा नेमक्या कुठून आल्या, कशासाठी आल्या व कोणाकडून आल्या याचा उलगडा पोलीस करीत आहेत.

दोन दिवसांपूर्वी आर्थिक व्यवहारातून झालेल्या मारहाणीत एका व्यक्तीचा मृत्यू झाला होता. यानंतर जमावाने आक्रमक होत उदगीर येथे दगडफेक केली होती.

या दगडफेकीत अनेक गाड्यांचे नुकसान झाले होते. काही लोक दगडफेकीत जखमी झाले होते. पोलिसांनी दोन दिवसात कसून तपास करत यातील सूत्रधारांच्या मुसक्या आवळल्या आहेत.

यासाठी पोलिसांनी रस्त्यावरील अनेक सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे फूटेज तपासले. यातील दगडफेक करणाऱ्या सूत्रधारांना अटक केली आहे. यात काही जणांची राजकीय पार्श्वभूमी आहे हे विशेष !

वेगवेगळ्या राजकीय पक्षाशी निगडित असलेले हे लोक अचानकपणे एकत्र का आले? उदगीर शहरातील शांतता भंग करण्यामागे यांचा नेमका काय उद्देश होता?

या मागे कटकारस्थान कोणी आणि का केले होते याचा तपास आता लातूर पोलीस करत आहेत.  या प्रकरणात आता जुन्या नोटा सापडल्याने मोठे खुलासे होतील का? हे पाहावे लागणार आहे.

काय होते प्रकरण?

शहरापासून 3 किमी अंतरावर असलेल्या हैबतपूर येथे शफी अहमद सय्यद (वय 32) आणि त्यांच्या मित्रामध्ये भांडण झाले होते.

शफी सय्यद यांना जास्त मार लागल्याने त्यांना उपचारासाठी दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान मंगळवारी (19 जानेवारी) त्यांचा मृत्यू झाला.

आरोपीला तात्काळ अटक करावी अन्यथा मृतदेह ताब्यात घेणार नसल्याची भूमिका नातेवाईकांनी घेतली. मग पोलिसांनी आश्वसन दिल्यानंतर मृतदेह ताब्यात घेत अंत्यसंस्कार करण्यात आले.

मात्र, तोपर्यंत शफीच्या नातेवाई आणि मित्रांनी उदगीर शहरात दगडफेक करण्यास सुरुवात केली. यामध्ये बस, कार या वाहनांचे नुकसान झाले आहे तर अनेकजण जखमीही झाले आहेत.

जिल्हा पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे अतिरिक्त पोलिस अधीक्षक हिम्मत जाधव यांनी उदगीरात तळ ठोकून हा तणाव निवळला. शहराची शांतताभंग करणाऱ्या‍वर गुन्हे दाखल केले.   रज्जाक चाऊस या पाच आरोपींना अटक करण्यात आली.

एका आरोपीकडे जुन्या चलनी नोटा सापडल्या

या प्रकरणी अटक करण्यात आलेल्या आरोपीं पैकी एका आरोपीकडे जुन्या चलनी (बंद झालेल्या) एक हजार रुपयाच्या अशा दहा लाखाच्या नोटा पोलिसांनी जप्त केल्या आहेत.

ही रोकड सापडल्याने आता या प्रकरणाने वेगळे वळण घेतले असल्याचे दिसून येत आहे. या नोटा बाळगल्याप्रकरणी वेगळा गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया पोलिसांनी सुरू केला आहे.

दगडफेकीची घटना घडल्यापासून लातूरचे पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे, अतिरिक्त पोलीस अधीक्षक हिंमत जाधव आणि पोलीस उप अधीक्षक सचिन सांगळे यांनी उदगीरात जातीने तपास कामात सक्रिय सहभाग घेतला आहे.

शहर पोलीस निरीक्षक नानासाहेब उबाळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक सुनील गायकवाड, पोलीस उपनिरीक्षक गजानन पाटील, व्यंकटराव एडके, सहदेव खेडकर या प्रकरणातील कायदा व सुव्यवस्था भंग करणाऱ्या आरोपींचा शोध घेऊन अटक करण्यासाठी तपास करीत आहेत.

 

 

 

 

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here