अन्न व औषधी प्रशासनाच्या वर्षभरात ४१ ठिकाणी धाडी | सव्वाकोटींचा गुटखा, जर्दा केला जप्त

228
CRIME news

लातूर : लातूर, निलंगा, औसा, उदगीर तालुक्यातील अनेक गावांना कर्नाटकची सीमा लागून आहे. या राज्यातून लाखो रुपयांची तस्करी केली जाते. सीमावर्ती भागातून मोठ्या प्रमाणात गुटखा आणला जातो. यामध्ये मोठे ‘गुटखा किंग डीलर’ गुंतलेले आहेत.

या गुटखा विक्री विरुद्ध धडक कारवाई करीत अन्न व औषधी प्रशासनाच्यावतीने गेल्या वर्षभरात अवैध गुटखा, सुगंधी जर्दा विक्रीविरोधात जिल्ह्यात ४१ ठिकाणी धाडी टाकण्यात आल्या होत्या.

पानपट्टी, किराणा दुकान, तसेच छोट्या हाॅटेल्समध्ये सर्रास गुटखा व सुगंधी जर्द्याची विक्री होते. यावर पाळत ठेवून अन्न व औषधी प्रशासन, तसेच पोलिसांच्या संयुक्त पथकाने वर्षभरात ४१ धाडी टाकून गुटखा जप्त केला.

या धाडीत १ कोटी २९ लाख ८८ हजार ५३१ रुपयांचा गुटखा जप्त करण्यात आला आहे. जप्त केलेला गुटखा ठेवण्यासाठी एफडीएकडे पुरेशी जागा नसल्याने संबंधित पोलीस ठाण्यात गुटखा ठेवावा लागतो.

राज्य शासनाने गुटखा विक्रीला बंदी घातली आहे. तरीही जिल्ह्यात अनेक ठिकाणी सरार्स खुलेआम गुटख्याची विक्री होते. याविरोधात अन्न व औषधी प्रशासनाच्यावतीने धाडी टाकण्यात आली होती.

जानेवारी ते डिसेंबर या १२ महिन्यांत ४१ धाडी टाकून १ कोटी २९ लाख ८८ हजार रुपयांचा गुटखा जप्त करण्यात आला आहे.

एकूण पाच ठिकाणी घातलेल्या छाप्यात जप्त केलेला ५५ लाख १५ हजार ७० रुपयांचा गुटखा नष्ट करण्यात आला आहे. उर्वरित गुटख्याचे सॅम्पल तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत.

विशेषत: लाॅकडाऊन काळात मोठ्या प्रमाणात चोरटी विक्री झाली. राज्य शासनाने गुटखा व सुगंधी जर्दा याच्यावर बंदी घातली आहे. मात्र, कायद्याची भीती न बाळगता बिनधास्तपणे विक्री करतात. त्यामुळे तरुणांना गुटखा सुपारीचे व्यसन लागत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here