वाराणसी : उत्तर प्रदेशातील वाराणसीत भाजपच्या माजी आमदारांना छेडछाड केल्याच्या कारणावरून लोकांनी मारहाण केली व कान पकडून माफी मागावयाला लावली आहे.
यासंदर्भातील एक व्हिडीओ सोशल मिडियावर व्हायरल होत आहे.
सदरील घटना वाराणसीच्या चौबेपुर पोलीस ठाणे हद्दीतील भगतुआ गावातील आहे.
येथे एका इंटर कॉलेजचे चेअरमन आणि माजी भाजप आमदार शंकर पाठक यांच्यावर एका विद्यार्थिनीसोबत अश्लील कृत्य केल्याचा आरोप करण्यात आला आहे.
पीडित विद्यार्थिनीच्या आरोपांची माहिती कुटुंबातील लोकांना कळताच कुटुंबीय चिडले.
पीडितेच्या कुटुंबीयांनी कॉलेजात माजी भाजप आमदार माया शंकर पाठक यांना मारहाण केली.
याचा एक व्हिडीओ तयार करून सोशल मीडियावर व्हायरल केला आहे.
वाराणसी पोलीस या प्रकरणात तपास करीत आहे.
माया शंकर पाठक वाराणसीमध्ये कधी भाजप आमदार होते.
एमपी इन्स्टीट्यूट अँण्ड कम्पुटर कॉलेज नामक इंटर कॉलेज भगतुआ गावात चालवित होते.
माया शंकर पाठक 1991 मध्ये वाराणसीतील चिरईगाव विधानसभा भागात भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढले होते.
व्हायरल होणारा व्हिडीओ दोन दिवसांपूर्वीचा असल्याचे सांगितले जात आहे.
आरोप आहे की, माजी भाजप आमदार माया शंकर पाठक यांनी आपल्या कार्यालयात बोलावून एका विद्यार्थिनी सोबत असभ्य व अश्लिल कृत्य केलं.
मात्र कोणीच याबाबत पोलीस तक्रार केली नाही.
मात्र हा मारहाणीचा व्हिडीओ खूप व्हायरल होत आहे.
हाय प्रोफाइल प्रकरण असल्या कारणाने पोलिसांनी स्वत: या प्रकरणात तपास सुरू केला आहे.
याबाब क्षेत्राधिकारी पिंडरा अभिषेक कुमार पांडे यांनी सांगितले की, अद्याप दोन्ही पक्षांमधून कोणीही तक्रार दाखल केलेली नाही.
मात्र व्हिडीओतून सत्य समोर येईल. यावर कायदेशीर कारवाई केली जाईल.