उदगीर : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस बसवराज पाटील नागराळकर यांच्या वाढदिवसानिमित्त विविध समाजोपयोगी उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
दि. 2 जानेवारी रोजी बरकत नगर येथे राष्ट्रवादी महिला काँग्रेस उदगीर शहर व उदयगिरी लॉयन्स नेत्र रुग्णालय, उदगीरच्या सयुक्त विद्यमाने मोफत नेत्र तपासणी व मोतिबिंदू शस्त्रक्रिया शिबिर संपन्न झाले.
शिबिराचे उद्घाटन राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष समिर शेख यांच्या हस्ते करण्यात आले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या शहराध्यक्षा अॅड. दीपालीताई औटे होत्या.
तर प्रमुख पाहुणे म्हणून उदयगिरी लॉयन्स नेत्र रुग्णालयाचे अध्यक्ष. डॉ.रामप्रसाद लखोटिया, राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक विभागाचे प्रदेश सरचिटणीस अजिम दायमी, राष्ट्रवादी युवकचे प्रदेश सरचिटणीस इम्तियाज शेख, चर्चचे पास्टर वसंतराव चांदूरीकर, उदयगिरी लॉयन्स नेत्र रुग्णालय समन्वयक अभिजीत औटे, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस बालाजी कांबळे, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष अजय शेटकार, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सामाजिक न्याय विभागाचे तालुका सरचिटणीस किरण सूर्यवंशी, उपाध्यक्ष राहुल सोनकांबळे, तालुका उपाध्यक्ष संजय बोरगावे, सोनू हाशमी, महिला शहर उपाध्यक्षा अनिता काकरे, निर्मला चांदूरीकर, सुस्मिता माने, श्वेता भुताळे, शांताबाई टोंपे, रेणुका उपाडे, शेख पाशा, शेख इस्माईल, युसुफभाई बागवान, पाशा शेख, हिसाम शेख, युसुफ शेख, मुसा शेख, रविंद्र सोमवंशी, सिद्धार्थ सूर्यवंशी आदी उपस्थित होते.
या शिबिरामध्ये ३२६ जणांची नेत्र तपासणी करण्यात आली. तर ६६ रूग्णांचे मोतिबिंदू शस्त्रक्रिया केले जाणार आहे.
शिबिरास राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष चंदन पाटील नागराळकर यांची सदिच्छा भेट दिली.
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सक्रिय कार्यकर्ते शफी हाशमी, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सामाजिक न्याय विभागाचे तालुका कार्याध्यक्ष प्रदीप जोंधळे, शहराध्यक्ष प्रेम तोगरे, डॉ.जमिर शेख, सलिम शेख, जावेद शेख, इस्माईल शेख, शहर उपाध्यक्ष विशाल चांदुरकर, ता.उपाध्यक्ष राज ढोबळे, महेश गायकावाड, संतोष जाधव, शहर उपाध्यक्ष समाधान सुर्यवंशी, जय जाधव, दिपक गायकवाड आदिनी परिश्रम घेतले.