मुंबई : फेसबुक मैत्रीचे माध्यम असले तरी त्यात अनेकांची फसगत झाल्याची अनेक उदाहरणे आहेत. नागपूरच्या जेष्ठ नागरिकाची अशीच फसगत झाली होती, त्यानंतर पुन्हा एक धक्कादायक घटना समोर आली आहे.
अधिक माहिती अशी कि, तक्रारदाराला गेल्यावर्षी डिसेंबरमध्ये अंकिता शर्मा नावाच्या तरूणीने फेसबुकवर फ्रेन्ड रिक्वेस्ट पाठवली होती. ती स्वीकारल्यानंतर तरुणीने तक्रारदारासोबत फेसबुकवर चॅटींग करण्यास सुरूवात केली.
त्यावेळी जवळीक साधून या तरुणीने तक्रारदाराकडे WhatsApp क्रमांकाची मागणी केली. त्यानंतर या तरुणीने व्हॉट्स WhatsApp व्हिडीओ कॉल केला.
तक्रारदाराने तो स्वीकारला असता समोर एक महिला अश्लील चाळे करत असताना दिसून आली. त्यानंतर या महिलेने तक्रारदाराला गुप्तांग दाखवण्यास सांगितले. वारंवार मागणी केल्यानंतर तक्रारदार नग्न झाला.
त्यानंतर तात्काळ त्यांच्या WhatsApp वर एक व्हिडिओ प्राप्त झाला. त्यात तक्रारदार यांचा नग्न चित्रफीत होती. तसेच जून्या दूरध्वनींचे मिक्सींगही करण्यात आले होते.
ही चित्रफीत फेसबुक व फेसबुकवरील ग्रुपमध्येमध्ये प्रसारीत करण्याची धमकीचा संदेश पाठवला होता. या प्रकारानंतर काही वेळाने एका व्यक्तीचा दूरध्वनी आला. संबंधीत चित्रफीत समाज माध्यमांवर वायरल न करण्यासाठी खंडणीची मागणी केली.
फेसबुकवरील मैत्रीणीने घेतलेल्या नग्न छायाचित्राच्या सहाय्याने खंडणीची मागणी केल्याप्रकरणी डी.बी. मार्ग पोलिसांनी आग्रा येथून एका संशयीताला अटक केली आहे. या टोळीने अशा पद्धतीने अनेकांकडून खंडणी उकळली असल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे.
आरोपीने 21 हजार रुपये तात्काळ एका खात्यामध्ये जमा करण्यासाठी सांगितले. अन्यथा सर्वत्र बदनामी करण्यात येईल, असे सांगितले. त्यामुळे घाबरलेल्या तक्रारदाराने चार हजार 999 रुपये या खात्यावर जमा केले.
या संपूर्ण प्रकारामुळे घाबरलेल्या तक्रारदाराने याप्रकरणी याप्रकरणी पोलिसांकडे तक्रार केली. त्यानुसार डी.बी. मार्ग पोलिसांनी भादंवि कलम 384, 385 सह माहिती तंत्रज्ञान गैरवापर प्रतिबंधक कायद्या अंतर्गत 66(क), 67, 67(अ) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला.
याप्रकरणात तपासादरम्यान पोलिसांनी आर्थिक व्यवहाराची माहिती घेतली. त्यावेळी खातेदार हा उत्तर प्रदेशातील आग्रा येथील रहिवासी असल्याचे निष्पन्न झाले.
त्यानुसार डीबी मार्ग पोलिसांनी आग्रा येथून त्याला अटक केली आहे. अनुपसिंग भदौरिया असे अटक आरोपीचे नाव असून त्याच्या चौकशीतून मिळालेल्या माहितीवरून पोलिस अधिक तपास करत आहेत.