फेसबुकवर झालेल्या मैत्रीने तरुणीचे आयुष्य उध्वस्त झाले | फेसबुक फ्रेंड व त्याच्या 25 मित्रांनी मिळून केला सामूहिक बलात्कार

564

दिल्लीतील एका युवतीला बोलावून फेसबुक फ्रेंड व त्याच्या 25 मित्रांनी मिळून सामूहिक बलात्कार केल्याचे उघड झाले आहे. फेसबुकवर मैत्रीनंतर एका मित्राने तिला आपल्या घरच्यांशी भेटण्यासाठी बोलावले असल्याचा आरोप तीने केला आहे.

नवी दिल्ली : सोशल मीडियावर होणारी ओळख आणि त्यातून निर्माण झालेली भावनिक गुंतवणूक नवीन नाही. सोशल मीडियावर भेटणारी व्यक्ती वास्तविक जीवनात तशीच असते याचीही खात्री देता येत नाही. या आभासी माध्यमातून झालेली ओळख व त्यातुन झालेली आर्थिक फसवाफसवी, लूट, लैंगिक शोषण, बलात्कार यासारखे भयंकर गुन्हे घडत असतात.

दिल्लीतील एका २२ वर्षीय युवतीवर हरियाणा येथे सामुहिक बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. सर्वात संतापजनक गोष्ट म्हणजे तिच्याबरोबर एक-दोन नव्हे, तर रात्रीपासून दुसर्‍या दिवशी सकाळपर्यंत २५ जणांनी आळीपाळीने बलात्कार केला.

सविस्तर वृत्त असे की, सदरील तरुणाची पिडीत तरुणीशी फेसबुकवर ओळख झाली. त्यानंतर त्या तरुणाने तिला प्रेमाच्या जाळ्यात ओढले व तिला फुस लाऊन आई-वडिलांशी ओळख करुन देण्याच्या बहाण्याने तिला हरियाणातील पलवल येथे बोलावून घेतले होते.

या बलात्काराच्या घटनेने संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली. पोलिसांनी मुख्य आरोपीला अटक केली आहे. इतक्या मोठ्या घटनेनंतर तिला बरे होण्यास ९ दिवस लागले. त्यानंतर तीने पोलिस ठाणे गाठले आणि फिर्याद दिली.

या पिडीतेने आपल्या तक्रारीमध्ये सांगितले की यावर्षी जानेवारीमध्ये तिने फेसबुकवर सागर (२३) नावाच्या युवकाशी मैत्री केली. दोघांमध्ये गप्पा सुरू झाल्या, मैत्री जसजशी वाढत गेली तसतसे दोघांनी एकमेकांना आपला मोबाइल नंबर दिला आणि मग दोघेही तासनतास मोबाईलवर बोलू लागले.

पिडीतेने सांगितले की, ती घरकाम करते आणि चार वर्षांपासून दिल्लीत राहत आहे. या आरोपीने तिच्यासमोर प्रेम प्रस्ताव ठेवला आणि नंतर तिच्याशी लग्न करण्याचे आश्वासन दिले.

आरोपीने तिला सांगितले की त्याचे पालक पलवलच्या होडल गावात राहतात. त्याला तिची आई-वडिलांशी ओळख करून द्यायची आहे. त्याने खोटे बोलून त्या युवतीला भेटण्याच्या बहाण्याने बोलावून घेतले.

पिडीतेने सांगितले की, ३ मे रोजी ती होडल येथे गेली आणि सागरला भेटली. पण सागर तिला घरी घेऊन जाण्याऐवजी रामगड गावच्या जंगलात घेऊन गेला. त्याचा भाऊ आणि त्याचे मित्र तेथील ट्यूबवेलजवळ दारू पित होते. त्या सर्वांनी मिळून रात्रभर तिच्यावर सामूहिक बलात्कार केला.

दुसऱ्या दिवशी सकाळी तिला आकाश नावाच्या व्यक्तीकडे नेण्यात आले तिथे देखील ५ जणांनी तिच्यावर बलात्कार केला. तिची गंभीर अवस्था पाहता त्या नराधमांनी तिला बदरपुर सीमेवर फेकून दिले आणि पळून गेले.

मुख्य आरोपीला अटक, इतरांचा शोध

पिडीतेला या आघातातून सावरण्यास नऊ दिवस लागले. १२ मे रोजी तिने हसनपूर पोलिस स्टेशन गाठले आणि सागरसह २४ जणांविरूद्ध सामूहिक बलात्काराची तक्रार दाखल केली.

घटनेपासून ती अंथरुणावर असल्याचे तिने पोलिसांना सांगितले. तिची शारीरिक आणि मानसिक स्थिती अशी नव्हती की ती काहीही करु शकेल. जेव्हा प्रकृती जरा सुधारली तेव्हा ती पोलिस ठाण्यात आली.

हसनपूर पोलिस स्टेशनचे एसएचओ राजेश यांनी सांगितले की शुक्रवारी सागरला अटक केली असून चौकशीनंतर इतरांना लवकरच अटक करण्यात येईल.
सोबतच सोशल मीडियावर ओळख झालेल्या कोणत्याही अनोळखी व्यक्तीवर विश्वास न ठेवता, सर्व माहिती घेऊनचं पुढचे निर्णय घ्यावेत असे आवाहन केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here