Fuel Price Hike for Farmers | शेतकऱ्यांना इंधन दरवाढीची फटका, मशागतीचा खर्च वाढला

174
Fuel Price Hike for Farmers

लातूर : गेल्या काही दिवसांपासून डिझेलच्या (Diesel Rate Hike) दरात सातत्याने वाढ होत आहे. शेतात यांत्रिकीकरणाचा मोठ्या प्रमाणात वापर होऊ लागला असून ट्रॅक्टरच्या साहाय्याने अनेक कामे कली जातात.

डिझेलच्या वाढत्या दरामुळे मशागतीच्या खर्चात 25 टक्क्यांनी वाढ (Increased the Cost of Farming) झाली आहे.

या इंधन दरवाढीचा थेट फटका शेतकऱ्यालाही बसू लागलाय. नांदेड जिल्ह्यात शेतीतील मशागतीची कामे करण्यासाठी ट्रॅक्टरचा वापर वाढला आहे. अलीकडच्या काळात अल्पभूधारक शेतकरीही ट्रॅक्टर वापरू लागले आहेत.

जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात ट्रॅक्टरची संख्या आहे. नांगर करण्यापासून ते पालाकुट्टी आणि विविध पिकात फवारणी करण्यासाठीही भाव वाढले आहेत.

शेतकऱ्यांच्या खिशाला अधिक भार

एक पीक काढले की कमी कालावधीत शेतीची मशागत करून, शेतकरी दुसऱ्या पिकाची तयारी सुरू करतो. यासाठी विविध अवजारे व साहित्य साधनाचा वापर होतो. यंत्रामुळे शेतकऱ्याच्या वेळेच्या बचतीसह परिश्रम वाचले आहेत.

त्यामुळे ट्रॅक्टरच्या संख्येत भर पडत आहे . जिल्ह्यात प्रत्येक गावानुसार मशागतीचे दर वेगळे असल्याचे चित्र आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या खिशाला अधिक भार पडत आहे.

इंधनाचे दर गगनाला, भाजीपाल्यांना मात्र कवडीमोल भाव

एकाबाजूला इंधनाचे वाढते दर तर दुसऱ्या बाजूला भाजीपाल्यासह अन्य पिकांना अपेक्षित दर मिळत नाहीये. त्यातच इंधनवाढीमुळे शेतीमाल वाहतूकदेखील खर्चिक झाली आहे. याची सांगड घालणे शेतकऱ्यांना कठीण बनले आहे.

गेल्या वर्षी एकरी 7 हजार 500 ते 8 हजार रुपये येणारा खर्च आता 12 हजार ते 13 हजार 500 रुपयांवर गेला आहे. गेल्या महिनाभरापासून डिझेल आणि पेट्रोलच्या दरात दररोज पंचवीस ते तीस पैशांनी वाढ होत आहे. सध्या डिझेलचा प्रति लिटर 90 रुपये पर्यंत आहे. ऑक्टोबर ते मार्च महिन्यापर्यत सातत्याने वाढ झाली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here