उदगीर : शहराचा विकास झपाट्याने होत असून अनेक वर्षापासून प्रलंबित असलेली विकासकामे होत आहेत.
उदगीरच्या शहराच्या सौंदर्यात आणखी भर पडणार असून शासनाने उदगीर शहरातील हेरिटेज पोल स्ट्रीट लाईटसाठी सुमारे 50 लाखाच्या निधीस प्रशासकीय मान्यता दिली, असल्याची माहिती राज्यमंत्री संजय बनसोडे यांनी दिली.
महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियान (जिल्हास्तरीय) योजनेतंर्गत या कामात शासन निकषानुसार 25 टक्के स्वनिधी नगरपरिषद राबवायचा आहे.
या योजनेअंतर्गत उदगीर शहरातील महत्त्वाच्या ठिकाणी हेरिटेज पोल व स्ट्रीट लाईट बसवण्यात येणार आहे.
मागील वर्षापासून उदगीर शहराचा विकास झपाट्याने होत असून उदगीर शहरामध्ये अनेक नवीन विकास कामे सुरू होत आहेत.
नवीन तहसील कार्यालय, प्रशासकीय इमारत अशा विविध विकास कामामुळे शहराचा चेहरामोहरा बदलणार आहे.
या नव्याने होणारे हेरिटेज पोल व स्टीट लाईट मुळे शहराच्या सौदर्यात आणखी भर पडणार आहे अशी माहिती राज्यमंत्री संजय बनसोडे यांनी दिली.