भविष्यात येणारी महामारी ही कोरोनापेक्षा 10 पट भयंकर असेल | मायक्रोसॉफ्टचे (Microsoft) सहसंस्थापक बिल गेट्स

210

मुंबई : कोरोना व्हायरसच्या (Coronavirus) विळख्यातून बाहेर पडण्याचा जग सध्या प्रयत्न करत आहे. 

जगभरात या व्हायरसच्या पेशंट्सची संख्या ही 10 कोटींपेक्षा जास्त झाली आहे. तर, 22 लाखांपेक्षा जास्त जणांचा मृत्यू झाला आहे. 

भारतासह अनेक देशात कोरोना लसीकरणास सुरुवात झाली आहे. तर काही देश अजूनही लशीची प्रतीक्षा करत आहेत. त्याचवेळी भविष्यात येणारी महामारी ही कोरोनापेक्षा 10 पट भयंकर असेल, असा धक्कादायक इशारा बिल गेट्स यांनी दिला आहे.

बिल गेट्स यांचा इशारा 

‘सर्व देशांनी कोरोना महामारीपासून (Corona Pandemic) धडा शिकला पाहिजे’, असं मत गेट्स यांनी व्यक्त केलं. ते जर्मन मीडियाशी बोलत होते.

“जग आगामी महामारीसाठी सज्ज नाही. सर्व देशांमधील सरकारनं आपल्या नागरिकांचं संभाव्य महामारीपासून संरक्षण करणे आवश्यक आहे.

सध्याची महामारी गंभीर आहे, पण भविष्यातील महामारी यापेक्षा 10 पट गंभीर असू शकते,’’ असा इशारा त्यांनी यावेळी दिला.

‘कोरोना व्हायरसची लागण पाच वर्षांपूर्वी झाली असती तर त्यावरील औषध इतक्या लवकर बनवणं शक्य नव्हतं,’ असा दावा गेट्स यांनी केला आहे.

ज्या संस्था आणि शास्त्रज्ञांनी कोविड व्हॅक्सिन (COVID-19 Vaccine ) बनवण्यात मदत केली त्या सर्वांची गेट्स यांनी प्रशंसा केली.

जागतिक नेत्यांनी व्हॅक्सिन राष्ट्रवादापासून दूर राहावं आणि व्हॅक्सिन वितरण योग्य पद्धतीनं व्हावं यासाठी प्रयत्न करावेत, असं त्यांनी आवाहन केलं.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here