‘गंदी बात’ वेब सीरिजची अभिनेत्री गहना वशिष्ठला मुंबई पोलिसांच्या क्राईम ब्रान्चने अटक केली आहे.
तिच्यावर पॉर्न व्हिडीओ तयार करणे आणि वेबसाईटवर ते अपलोड करणे अशा प्रकारचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या संबंधी तिचे स्वत:चे एक प्रोडक्शन हाउस असल्याचं सांगण्यात येत आहे.
मुंबई पोलिसांच्या क्राईम ब्रॅन्चने अभिनेत्री गहना वशिष्ठला ऑनलाइन पॉर्नोग्राफी रॅकेट चालवल्याच्या गुन्ह्याखाली अटक केली आहे. शनिवारी तिची या प्रकरणी चौकशी सुरु होती.
तिला रविवारी न्यायालयात हजर करण्यात येणार असल्याचं सूत्रांनी सांगितले. त्यानंतर तिच्या जामीनाचा निकाल लागणार आहे.
सूत्रांच्या मते, अभिनेत्री गहना वशिष्ठ सोबतच तिचे सहकारी, साइड मॉडेल्स आणि संबंधित इतर लोकांवर पोलिसांनी तक्रार दाखल केली आहे.
-
तिने मोठ्या पडद्यावर क्रिकेट विश्वचषक 2015 मध्ये योगराज सिंग आणि अतुल वासनचा शो होस्ट देखील केला होता. या कार्यक्रमाला चाहत्यांनीही चांगला प्रतिसाद दिला.
एका वेबसाइटवर अॅडल्ट व्हिडिओंचे शूटिंग व अपलोड करण्याचा तिच्यावर आरोप आहे. ज्यामुळे तिला अटक करण्यात आली आहे. गहना वशिष्ठ याआधीही बर्याच वेळा चर्चेत राहिली आहे. वादांशी तिचा जुना संबंध आहे.
अभिनेत्री गहना वसिष्ठचे खरे नाव वंदना तिवारी आहे. तिचा जन्म छत्तीसगडच्या चिमरी गावात झाला आहे. सुरुवातीपासूनच अभिनय आणि मॉडेलिंगमध्ये तिला रस आहे.
२०१२ साली तिने मिस आशिया बिकिनीचे विजेतेपदही जिंकले आहे. गेहनाने हिंदी व तेलगू चित्रपटातील अनेक जाहिराती केल्या आहेत.
काय आहे प्रकरण?
दोन दिवसापूर्वी मालाड येथे एका रेड दरम्यान पोलिसांना काही माहिती मिळाली होती. पोलिसांना असे समजले होतं की मड आयलँड परिसरातील काही बंगल्यांमध्ये फिल्म शूटिंगच्या नावावर वेश्या व्यवसाय चालतो आणि शॉर्ट पॉर्न व्हिडीओ तयार करण्यात येतात.
त्यानंतर पोलिसांनी त्या ठिकाणी छापेमारी केली. त्यावेळी पोलिसांच्या असं लक्षात आले की या क्षेत्रात प्रवेश करायची इच्छा असलेल्या स्ट्रगलर मॉडेल्सना चित्रपटात ब्रेक देण्याच्या नावाखाली पॉर्न व्हिडीओत काम करायला सांगितले जायचे. या प्रकरणी पोलिसांनी दोन मुलींची सुटका केली आहे.
कोण आहे गहना वशिष्ठ?
गहना वशिष्ठ ही बालाजी प्रोडक्शनची अॅडल्ट सीरिज ‘गंदी बात’ ची अभिनेत्री आहे. तीने या पूर्वी मिस एशिया बिकिनीचा पुरस्कारही जिंकला आहे. गहना वशिष्ठने आतापर्यंत अनेक हिंदी आणि दाक्षिणात्य चित्रपटात काम केलं असून अनेक जाहिरातीतही ती झळकली आहे.