मैत्रिणींसोबत फिरायला गेलेल्या तरुणीचे अपहरण करून सामूहिक बलात्कार

140
Gang rape by kidnapping a young woman who went for a walk with her friends

बरेली : उत्तर प्रदेशमधील बरेली येथे एक धक्कादायक घटना घडली आहे. आपल्या मैत्रिणीसह स्कूटी फिरायला गेलेल्या एका युवतीचे अपहरण करण्यात आले. इतकेच नाही तर आरोपीने तिच्यावर सामूहिक बलात्कार करण्यात आला आहे.

आरोपीने पीडित मुलीला आणि तिच्या मैत्रिणीला मारहाण केली. त्यानंतर पीडितेला अज्ञात ठिकाणी नेले. त्यानंतर आरोपींनी तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. याप्रकरणी इजतनगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अजित पवार यांच्यासोबत सत्ता स्थापन करण्याच्या निर्णय शंभर टक्के चूक होता : देवेंद्र फडणवीस

पीडितेच्या भावाने सांगितले की, त्याची बहीण 31 मे रोजी घराबाहेर पडली होती. स्कूटरवर जात असताना पाच ते सहा जणांच्या उनाड टोळक्याने त्याच्या बहिणीचे व तिच्या मैत्रिणीला इजतनगर भागातील भगवानपूर धिमारी येथे अडवले. त्यानंतर त्याने तिला मारहाण करण्यास सुरवात केली.

आरोपींनी त्यांना चाकू दाखवत जिवे मारण्याची धमकी दिली आणि पीडित मुलीचे अपहरण केले. त्यानंतर, त्याने तिला एका अज्ञात ठिकाणी नेले आणि आणि तिच्यावर बलात्कार केला. या घटनेनंतर पीडित मुलगी खूप घाबरली होती. आपल्यासोबत काय घडले ते तिने आपल्या घरच्यांना सांगितले नाही.

अखेर शनिवारी पीडित मुलीने आपल्या बहिणीला जे घडले ते सांगितले आणि त्यानंतर सर्वजण हादरून गेले. त्यानंतर पीडित महिलेने आपल्या कुटूंबासोबत जाऊन पोलिस ठाण्यात तक्रार दिली.

वरिष्ठ पोलिस अधीक्षक रोहितसिंग सजवान म्हणाले की, पीडित मुलीच्या तक्रारीनुसार आरोपीविरूद्ध एफआयआर दाखल करण्यात आला आहे. आरोपींना पकडण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.

संबंधित बातम्या !

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here