शेतकरी आंदोलनात 26 वर्षीय मुलीवर सामूहिक बलात्कार; कार्यकर्त्यांविरोधात एफआयआर दाखल

362

नवी दिल्ली : राष्ट्रीय राजधानीच्या सीमेवर गेल्या काही महिन्यांपासून शेतकरी आंदोलन करीत आहेत. टिकरी सीमेवर मोठ्या संख्येने निदर्शक उपस्थित आहेत. पण या आंदोलनातील धक्कादायक बातमीमुळे खळबळ उडाली आहे.

या आंदोलनात सामील होण्यासाठी बंगालहून आलेल्या एका युवतीवर सामूहिक बलात्कार करण्यात आला होता. त्यानंतर या युवतीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. कोविडच्या संसर्गामुळे या मुलीचा मृत्यू झाल्याची माहिती पोलिसांनी दिली. मुलीच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारीनंतर पोलिसांनी तपास सुरू केला आहे.

सोशल आर्मीच्या कार्यकर्त्यांनी या मुलीवर सामूहिक बलात्कार केल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. पोलिसांनी सोशल आर्मीचे अनूप आणि अनिल मलिक यांच्यासह चार जणांविरूद्ध एफआयआर नोंदविला आहे.

Covid update : कोरोनाच्या दोन लसींमध्ये किती अंतर असावे? लस सर्वांपर्यंत पोहोचवणार?

मुलीवर बलात्कार करणारे आरोपी हे शेतकरी चळवळीचे कार्यकर्ते आहेत. आंदोलनस्थळी उपस्थित ज्येष्ठ शेतकरी नेते या संदर्भात हात वर करत आहेत. घटनेची चौकशी करण्यासाठी डीएसपीच्या अध्यक्षतेखाली एसआयटी स्थापन करण्यात आली आहे.

महिला आयोगानेही दखल घेतली

राष्ट्रीय महिला आयोगानेही हे प्रकरण उपस्थित केले आहे. “शेतकरी नेते योगेंद्र यादव यांना या घटनेची माहिती होती याबद्दल आम्हाला आश्चर्य वाटते,” असे आयोगाचे अध्यक्ष म्हणाले. मात्र, त्यानी पोलिसांना याची माहिती दिली नाही. आम्ही या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. महिला आयोगाने योगेंद्र यादव यांनाही नोटीस पाठविली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here