सनी लिओनीचे नटूनथटून बाथरूममध्ये फोटोशूट, ट्रान्सवूमनला पाठवलं गिफ्ट
बॉलिवूडची बोल्ड अभिनेत्री सनी लिओनीने एक फोटोशूट केले आहे. हे फोटोशूट बाथटबमधील असून ती ग्रीन आऊटफिटमध्ये दिसत आहे. नटूनथटून ती बाथटबमध्ये शानदार पोझ देताना दिसत आहे.
सनीचा नवा चित्रपट नुकताच रिलीज झाला आहे. या चित्रपटात ती ॲक्शन सीन करताना दिसते. याआधी सनीने विक्रम भट्ट यांच्या एका नव्या वेबसीरीजचे काम हाती घेतले आहे. यामध्ये तिच्यासोबत सोफी चौधरी दिसणार आहे.
तिने फोटो शेअर करत कॅप्शन लिहिलंय- Loved this look for Goa!
सनीने सायशाला पाठवलं गिफ्ट
ट्रान्सवूमन डिझायनर सायशा शिंदेला सनीने पाठिंबा दिला आहे. तिने सायशासाठी तिचे ब्युटी प्रोडक्ट आणि एक तिच्यासाठी नोट गिफ्ट म्हणून पाठवली आहे.
तिने सायशाला पाठवलेल्या नोटमध्ये सनीने लिहिलंय, ‘तुझ्यातला बदल इतका सोपा नव्हता. तू खूप धाडसी आहेस आणि वास्तवात तू कोण आहेस, हे सागंण्यासाठी एक पाऊल पुढे टाकलेस.
तू निडर, प्रेमळ, काळजी घेणारी, धाडसी आणि स्वतंत्र ट्रान्सवूमन आहेस. हे माझ्याकडून (गिफ्ट) तुझ्या अद्भून दुनियेला चमकवण्यासाठी आहे. मी तुझ्यासोबत नेहमी असेन. ट्रान्सवूमन आणि वूमन युनाईट. लव्ह सनी लिओनी.’