भोपाळ : निशातपुरा भागात एका 10 वीच्या विद्यार्थिनीला विकण्यात आले.
ब्यूटी पार्लरची संचालिका आणि तिच्या सोबतींनी रतलामला नेऊन 2 लाखांत विकल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.
पोलिसांनी या प्रकरणात अल्पवयीन मुलीला खरेदी करणारा तरुण आणि 2 बहिणींना ताब्यात घेतलं आहे.
याशिवाय एक महिला आणि एका कार चालकाचा शोध सुरू आहे.
एएसपी झोन -4 दिनेश कुमार कौशल यांनी दिलेल्या माहितीनुसार परिसरात राहणारी 15 वर्षीचा मुलगी दहावीत शिकते.
गेल्या 22 डिसेंबर रोजी तिने कुणाला काहीही न सांगता घर सोडलं.
शोध घेतल्यानंतरही जेव्हा त्यांना काही सापडलं नाही. तेव्हा तिच्या भावाने 27 डिसेंबर रोजी तक्रार दाखल केली.
मुलीला इकडून तिकडे पाठवत राहिले
पोलिसांनी अज्ञातांवर अपहरणाचा गुन्हा दाखल केली असून तपास सुरू केला आहे.
तपासादरम्यान मिळालेल्या माहितीनुसार विद्यार्थिनीचं एका ब्युटी पार्लरमध्ये येणं-जाणं होतं.
या पार्लरच्या संचालिकेने सोनासोबत मैत्री केली. पोलिसांनी संचालिकेची चौकशी केली.
यावेळी तिने सांगितलं की, अल्पवयीन मुलीला गांधी नगर येथे राहणाऱ्या आपल्या बहिणीकडे पाठवलं होतं.
त्यानंतर मिळालेल्या माहितीनुसार संचालिकेची बहीण मोना तिला रतलामला घेऊन गेली.
त्यानंतर पूजाकडे सोपवलं. पूजाने 2 लाख रुपयात तिला महेश राठोडला विकलं.
लग्नासाठी अल्पवयीन मुलीची खरेदी
दुसरीकडे पोलिसांनी रतलाममधील महेश राठोडच्या घरातून अल्पवयीन मुलीला ताब्यात घेतलं.
चौकशीदरम्यान महेशने तिला पूजाकडून 2 लाख रुपयांना लग्नांसाठी खरेदी केल्याचं मान्य केलं.
पोलिसांनी महेश राठोड, मोना आणि सोना यांना अटक केली आहे.
रतलाममधील पूजा आणि ड्रायव्हर अर्जुनचा तपास सुरू आहे.