Girl Kidnapping and Raped | मुलीचे अपहरण करून बलात्कार, हत्येनंतर मृतदेह तलावात फेकला

130
CRIME news

हाजीपूर : बिहारच्या वैशाली जिल्ह्यात एका अल्पवयीन मुलाचे अपहरण करून तिच्यावर बलात्कार करण्यात आला.

मिळालेल्या माहितीनुसार, कटहरा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका गावातून गेल्या शनिवारी एक अल्पवयीन मुलगी बेपत्ता झाली होती. तिच्या कुटुंबीयांनी पोलिसांत तक्रार दाखल केली होती.

पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा दाखल केला होता. ६ जणांविरोधात अपहरणाची तक्रार दाखल केली होती. घटनेनंतर सर्व आरोपी फरार झाले आहेत. त्यांच्या अटकेसाठी पोलीस ठिकठिकाणी छापे मारत आहेत.

गेल्या शनिवारी केले होते अपहरण

कुटुंबीयांच्या म्हणण्यानुसार, गेल्या शनिवारी मुलीचे अपहरण करण्यात आले होते. आरोपींनी याआधीही धमक्या दिल्या होत्या. त्यानंतर मुलीचे अपहरण केले. तिच्यावर बलात्कार करून तिची हत्या केली.

तिचा मृतदेह तलावात फेकला. दरम्यान, पोलीस या घटनेचा तपास करत आहेत. आरोपींच्या अटकेसाठी ठिकठिकाणी छापे मारले आहेत. अद्याप कुणालाही अटक केली नाही, असे सांगण्यात येत आहे.

आरोपींच्या घराजवळील तलावात मृतदेह

गुरुवारी सकाळी आरोपींच्या घराजवळील तलावात अल्पवयीन मुलीचा मृतदेह तरंगताना दिसला. या घटनेने परिसरात खळबळ उडाली. घटनेची माहिती मिळताच, तेथे पोलीस पोहोचले. मृतदेह बाहेर काढून विच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here