धक्कादायक | बॉयफ्रेन्डला घरी बोलवून गर्लफ्रेन्डने केला ‘Acid Attack’

398
Girlfriend calls her boyfriend home and launches 'Acid Attack'

उत्तर प्रदेशच्या आग्रामध्ये एका गर्लफ्रेन्डने बॉयफ्रेन्डवर अ‍ॅसिड अटॅक केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. 

यामागचे कारण समोर आले की, बॉयफ्रेन्ड हा दुसऱ्या मुलीसोबत लग्न करणार होता म्हणून गर्लफ्रेन्डने दगाबाज बॉयफ्रेन्डवर अ‍ॅसिड फेकले. (Girlfriend calls her boyfriend home and ‘Acid Attack’)

आरोपी तरूणीचं नाव सोनम आहे. ती आग्र्यातील एका प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये नर्स आहे. तेच पीडित तरूण देवेंद्र एक पॅथॉलॉजीमध्ये असिस्टंट म्हणून जॉब करतो.दोघेही बऱ्याच वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये होते.

पोलिसांनी सांगितले की, जेव्हा देवेंद्रने एका दुसऱ्या मुलीसोबत लग्न करण्याचा निर्णय घेतला तेव्हा त्याची गर्लफ्रेन्ड सोनम भडकली. याच रागात तिने हे धक्कादायक पाउल उचलले. सोनमने गुरूवारी देवेंद्रवर अ‍ॅसिड हल्ला केला.

आग्र्याचे एसपी रोहन यांनी सांगितले की, हे कृत्य करण्यासाठी सोनमने पीडित देवेंद्रला काही कारण देत आपल्या घरी बोलवलं होतं.

सोनम त्याला म्हणाली होती की, माझ्या घरातील फॅन खराब झाला आहे. तो ठीक करण्यात तुझी मदत हवी आहे. जसा देवेंद्र तिच्या घरी पोहोचला तिने त्याच्यावर अ‍ॅसिड फेकले.

ते म्हणाले की, घटनेनंतर लगेच देवेंद्रला एका खाजगी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. पण अ‍ॅसिडमध्ये तो पूर्णपणे जळाल्याने त्याचा जीव वाचू शकला नाही. देवेंद्रने हॉस्पिटलमध्ये अखेरचा श्वास घेतला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here