न्याय द्या ! अन्यथा आत्महत्या करणार; पीडितेचा इशारा | राष्ट्रवादीचे मेहबूब शेख पुन्हा अडचणीत?

210

पुणे : राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मेहबूब इब्राहिम शेख यांच्या विरोधात औरंगाबादमध्ये 26 डिसेंबर 2020 रोजी बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.

त्यावेळी विरोधी पक्षाने शेख यांना अटक करण्याची मागणी केली होती. मात्र काही दिवसांनी तक्रारदार पीडित तरूणी गायब झाल्याची माहिती समोर आली होती. त्यानंतर भाजपा व इतर पक्षांनी सोयीस्कर मौन धारण केले होते.

त्यानंतर हे प्रकरण एकदमच शांत झाले होते. परंतू अशातच पुन्हा पीडीत तरूणीने भूमाता ब्रिगेडच्या अध्यक्षा तृप्ती देसाई यांच्यासह पत्रकार परिषद घेत राज्य सरकारला आत्महत्या करण्याचा इशारा दिला आहे.

याच पार्श्वभूमीवर देसाई यांनी शेख यांच्यावर टीका केली आहे. त्यामुळे राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष मेहबूब शेख यांच्या अडचणीत वाढण्याची शक्यता आहे.

मात्र आता भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई यांच्यासह पीडित तरुणीने राज्य सरकार आणि गृहखात्याला कडक इशारा दिला आहे.

मेहबूब शेख यांनाअटक करा अन्यथा मला आत्महत्या करण्याशिवाय पर्याय नाही असा इशारा पीडित तरुणीने सरकारला दिला आहे.

”मला न्याय मिळाला नाही तर 5 दिवसांच्या आत आत्महत्या करणार असून माझ्या आत्महत्येला मेहबूब शेख जबाबदार असतील, असंही तिने म्हटले आहे. त्यामुळे मेहबूब शेख यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. भूमाता ब्रिगेडच्या अध्यक्षा तृप्ती देसाई आणि पीडित तरुणीने पुण्यात पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी संबंधित तरुणीने राज्य सरकार आणि गृहखात्याला इशारा दिला आहे.

दरम्यान, तृप्ती देसाई यांनी राज्य सरकारवर जोरदार टीका केलीय. गुन्हा दाखल होऊन सव्वा महिना उलटला पण अद्याप आरोपीला अटक नाही.

मेहबूब शेख यांनी पीडित तरुणीला जबरदस्तीने गाडीत बसवून बलात्कार केला आहे. सर्वसामान्य लोक आणि सत्ताधारी पक्षातील पदाधिकारी, मंत्र्यांसाठी कायदा समान नाही का? असा सवाल देसाई यांनी विचारला आहे.

न्याय मिळाला नाही तर पीडित तरुणीने आत्महत्या करणार असल्याचं म्हटले असले तरी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांकडून पीडितेला त्रास देण्याचा प्रयत्न केला जात आहे.

या मुलीचे काही बरं वाईट झाले तर त्याला मेहबूब शेख जबाबदार असतील, असे तृप्ती देसाई म्हणाल्या.राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांकडून पीडितेला त्रास देण्याचा प्रयत्न केला जात आहे.

या मुलीने काही बरं वाईट केलं तर त्याला मेहबूब शेख जबाबदार असतील, असंही देसाई यांनी म्हटलं आहे.यावेळी त्यांनी राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे आणि पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणावरून राज्य सरकारवर टीका केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here