नोकरीची सुवर्णसंधी ! दहावी बारावी पास तरुणांसाठी भारतीय रेल्वेमध्ये १ लाख ४० हजार जागांसाठी मेगाभरती

186

दहावी, बारावी पास उमेदवारांसाठी खुशखबर आहे. भारतीय रेल्वे विभागात मेगा महाभरती होणार असून यासाठी १ लाख ४० हजार पदे भरावयाची आहेत.

एनटीपीसी (NTPC), पॅरा मेडिकल स्टाफ (Para Medical Staff), मिनिस्ट्रीयल आयसोलेटड कॅटेगरी (Ministrials Isolated Category) तसेच आरआरसी ग्रुप डी (RRC-Group D) च्या पदांसाठी सुवर्णसंधी आहे.

पदे अशी –

NTPC – कनिष्ठ लिपिकसह टायपिस्टसह टायपिस्ट/ लेखा लिपिकसह टायपिस्ट / ट्रेनी लिपिक / गुड्स गार्ड / स्टेशन मास्टर

Para Medical Staff – स्टाफ नर्स / आरोग्य मलेरिया निरीक्षक / फार्मासिस्ट प्रयोगशाळा सहाय्यक

Ministrials Isolated Category – स्टेनोग्राफर / मुख्य कायदा संरक्षक / ज्युनिअर ट्रान्सलेटर (३५ हजार २०८ पदे)

RRC-Group D – ट्रक मेंटेनर/ गेटमॅन/ पॉईंट्समॅन / हेल्पर्स (१ लाख ३ हजार ७६९ पदे)

परीक्षा पध्दत –

रेल्वे बोर्डाद्वारे वरील उपरोक्त पदांसाठी ऑनलाईन स्वरुपाची परीक्षा घेण्यात येईल.

अट –

एका उमेदवाराला एका पदासाठी अर्ज करता येईल.

परीक्षेची तारीख –

NTPC – २८ डिसेंबर २०२० ते मार्च २०२१

RRC-Group D – एप्रिल २०२१ ते जून २०२१

Ministrials Isolated Category – १५ डिसेंबर ते १८ डिसेंबर २०२०

अधिक माहितीसाठी www.rrbmumbai.gov.in पाहावे

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here