Good News | मुस्लिम समाजाकडून ‘श्रीराम मंदिरा’साठी 44 हजाराची देणगी

193
Good News | Donation from Muslim community for 'Shriram Mandir'

श्रीराम मंदिर उभारण्यात मुस्लिम समाजाने पुढाकार घेत श्रीरामपूर तालुक्यातील बेलापूर येथील मुस्लिम समाजाकडून 44 हजार 111 रुपयांची देणगी राम मंदिराचे कोषाध्यक्ष, गोविंद देवगिरी महाराज (राष्ट्र संतआचार्य किशोर व्यास) यांच्याकडे सुपूर्त केली.

देवगिरी महाराज (आचार्य किशोरजी व्यास) हे बेलापूर या जन्मगावी येणार असल्याची माहिती मुस्लीम बांधवांना मिळाली.

जामा मस्जिदचे चिफ ट्रस्टी जाफर आतार, बहोद्दीन सय्यद हैदर, अकबर टिन मेकरवाले, हाजी ईस्माईल रफीक शेख, शफीक बागवान, मुनीर बागवान, मोहसीन सय्यद, गँसुद्दीन शेख, आजिज शेख यांनी मुस्लिम समाजाची तातडीची बैठक बोलविली.

बैठकीत राम मंदिराला देणगी देण्याचा विषय घेण्यात आला. सर्व मुस्लिम समाजाने आपापल्या परीने राम मंदिरासाठी आर्थिक मदत केली.

आचार्य व्यास यांचे गावात आगमन होण्यापूर्वी मुस्लिम समाजाने 33 हजार रुपये जमा केले. आचार्य व्यास यांचे जामा मस्जिदमध्ये आगमन होताच चिफ ट्रस्टी जाफर आतार व बहोद्दीन सय्यद, हाजी ईस्माईल, अकबर टिन मेकरवाले यांनी त्यांचे स्वागत केले.

आणखी 11 हजार रुपये जमा करून मुस्लिम समाजाच्या वतीने राम मंदिर बांधाकामासाठी 44 हजार रुपयांची देणगी देण्यात आली.

हाजी ईस्माईल म्हणाले, राम मंदिराच्या उभारणीत बेलापूरातील मुस्लीम समाजाचा सहभाग असावा म्हणून आम्ही हा खारीचा वाटा उचलण्याचा प्रयत्न केला.

अकबर टिन मेकरवाले म्हणाले, एका चांगल्या धार्मिक कार्यक्रमात सहभागी होण्याचे भाग्य मुस्लिम समाजाला लाभले गावाच्या वतीने आणखी मोठी मदत करण्याचा प्रयत्न करु असेही ते म्हणाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here