मराठवाड्यासाठी गुड न्यूज : मोदी सरकारमध्ये खा. प्रीतम मुंडे यांना केंद्रात ‘कॅबिनेट मंत्रीपद’ मिळण्याची शक्यता?

920
मराठवाड्यासाठी गुड न्यूज : मोदी सरकारमध्ये खा. प्रीतम मुंडे यांना केंद्रात 'कॅबिनेट मंत्रीपद' मिळण्याची शक्यता?

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी रात्री गृहमंत्री अमित शहा आणि भाजप राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांच्यासोबत बैठक केली. सोबतच नरेंद्र मोदींनी काही मंत्र्यांशी वैयक्तिक चर्चा सुरू केली आहे. या मंत्रिमंडळाच्या फेरबदलात खासदार डॉ. प्रीतम मुंडे यांनाही मंत्रीपद मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

बीड : भारतीय जनता पार्टी तर्फे केंद्रात फार मोठे बदल करण्याची तयारी सुरू असून त्याचाच एक भाग म्हणून केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तार करण्यात येणार आहे.

केंद्रीय मंत्रिमंडळात फेरबदल करून डॅमेज कंट्रोल सोबतच नव्या चेहर्‍यांना संधी दिली जाणार आहे. पश्चिम बंगालमध्ये झालेला पराभव आणि आगामी उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा फेरबदल होणार असल्याचे बोलले जात आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी रात्री गृहमंत्री अमित शहा आणि भाजप राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांच्यासोबत प्रदीर्घ बैठक केली. आगामी मंत्रिमंडळ विस्ताराबाबत विचारमंथन केले.

नरेंद्र मोदींनी काही मंत्र्यांशी वैयक्तिक चर्चा सुरू केली असून त्यांच्या कामकाजाचा आढावाही घेतला. काही मंत्र्यांनी मागच्या टर्ममध्ये अतिशय सुमार कामगिरी केली असून त्यांना डच्चू दिला जाणार आहे; तर काही नवीन चेहऱ्यांना मंत्रिमंडळात सामावून घेतले जाणार आहे.

दरम्यान या फेरबदलात खासदार डॉ. प्रीतम मुंडे यांनाही मंत्रीपद मिळण्याची शक्यता व्यक्त जात आहे. मराठवाड्यावर केंद्रीय मंत्रिमंडळात सातत्याने अन्याय झाला आहे. आगामी निवडणुका पाहता ओबीसी नेतृत्वाला संधी देण्यासाठी प्रीतम मुंडे यांचे नाव निश्चित मानले जात आहे.

पीयूष गोयल, प्रकाश जावडेकर तसंच नरेंद्र तोमर यांच्यासारख्या ज्येष्ठ मंत्र्यांवर दोन ते तीन मंत्रालयांची जबाबदारी आहे. त्यामुळे या मंत्रिमंडळाच्या फेरबदलात या मंत्र्यांवरील ताण कमी करण्यासाठी नव्या चेहऱ्यांना संधी दिली जाणार आहे.

या आठवड्याभरात हा विस्तार होण्याची शक्यता आहे. त्यात राज्यातून डॉ. प्रीतम मुंडे यांचंही नाव आघाडीवर आहे. त्यामुळे मराठवाड्याला केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान मिळणार का? याची उत्सुकता सर्वांना आहे.

राज्यात पंकजा मुंडे यांच्यावर सातत्याने अन्याय झाला असून त्यांना पक्षातर्फे संधी दिली जात नाही ही भावना बळावली आहे.

त्यांनी अनेकदा उघड तर कधी अप्रत्यक्षपणे आपली नाराजी व्यक्त केली आहे. त्यांनी आपल्यावर अन्यायाकडे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला आहे. गोपीनाथ मुंडे समर्थकांमध्ये राज्यात नाराजी आहे.

मुंडे समर्थक कार्यकर्त्यांची नाराजी दूर करून आगामी निवडणुकीत डॉ.प्रीतम मुंडे व पंकजा मुंडे यांच्याकड़े ओबीसी नेतृत्व सोपविण्यात येणार असल्याची जोरदार चर्चा आहे.

प्रीतम मुंडेच्या कामाची दखल

डॉ. प्रीतम मुंडे या सध्या बीडच्या खासदार आहेत. दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्या द्वितीय कन्या आहेत. पंकजाताई मुंडे यांच्या लहान बहिण आहेत.

प्रीतमताईंनी यांनी 2014 ची लोकसभा पोटनिवडणूक लढवली. ही निवडणूक त्या तब्बल सहा लाख 96 हजार 321 मतांच्या फरकाने जिंकल्या होत्या. त्यानंतर 2019 च्या निवडणुकीत त्यांचा लीड कमी झाला.

तरीही प्रीतम मुंढे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवाराचा 1 लाख 68 हजार मतांच्या फरकाने पराभव केला होता. प्रीतमताईंच्या कामाची दखल घेऊन त्याच्यावर मंत्रिमंडळात नवी जबाबदारी सोपविण्यात येणार असल्याचे संकेत मिळत आहेत.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here